नांदेड(प्रतिनिधी)-घरातील भांडण रस्त्यावर आणले तर काय होवू शकते याचे प्रत्यंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या हकीकतीतून मिळते. याप्रकरणात एका महिलेने आपल्या चार पुरूष मित्रांसोबत आपल्या नवऱ्यालाच किडनॅप केले. त्याबद्दल चार पुरूष मित्रांसह महिलेला अटक झाली आहे. हा सर्व प्रकार एका कर सल्लागारासोबत घडला आहे. या प्रकरणात महिलेला कोणी मार्गदर्शन केले आहे हे शोधल्यानंतर अजून भरपूर बाबी समोर येतील.भाग्यनगर पोलीसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने दोन तासात ताब्यात घेतले आहे.
सोमठाणा ता.भोकर येथील कर सल्लागार प्रकाश तुकाराम श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न 20 मार्च 2006 रोजी गितांजली पि.बळवंतराव हाके रा.हाटकरवाडी ता.चाकूर जि.लातूर यांच्यासोबत झाले. या दाम्पत्याला एक 15 वर्षीय बालक आणि एक 10 वर्षीय बालिका अशी दोन आपत्य आहेत. एका महिन्यापुर्वी गितांजलीसोबत प्रकाश श्रीरामे यांचा वाद झाला. तेंव्हा त्यांनी नांदेड येथील मयुर विहार कॉलनीमधील आपले घर सोडून सोमठाणा ता.भोकर येथे राहण्यास सुरूवात केली.
1 डिसेंबर रोजी ते सोमठाण्यावरुन नांदेडला दररोजच्या कामकाजासाठी आले. त्यावेळी त्यांची पत्नी गितांजली त्यांना जिल्हा परिषद कार्यालयासमोर भेटली. माझी मुले कोठे आहेत, ती परत मला दे असा वाद रस्त्यावर घालत होती. त्यानंतर आम्ही दोघे मयुर विहार कॉलनीतील घरी गेलो. यावेळी सायंकाळचे चार वाजले होते. तेथे गितांजलीचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव (28) रा.दयासागर नगर दरोडा खुर्द, त्याच्यासोबत इतर गितांजलीचे मित्र दिलीपसिंग हरीसिंग पवार (29) रा.एमजीएम कॉलेजसमोर, अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया (38) रा.बाबानगर नांदेड, अमोल गोविंद बुक्तरे (33) रा.नवी वाडी पुर्णा रोड नांदेड हे सर्व होते. त्या सर्वांनी मिळून मला कार क्रमांक एम.एच.26 बी.क्यु.0016 मध्ये डांबून नेले. या कारचालकाचे नाव मला माहित नाही. मला सौरभ बार मालेगाव रोड येथे नेऊन आमच्या कारमधील एक माणुस उतरला तेथे माझी पत्नी त्या कारमध्ये बसली आणि आपल्या प्रियकरासह इतर तीन मित्रांना सांगत होते की, प्रकाशला तुम्ही मारून टाकता की मी मारु. तेंव्हा मला गाडीत मारहाण झाली. औंढा जाणाऱ्या रस्त्यावर नेऊन तेथून मला सोडून टाकले.
या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 437/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 364, 383, 387, 342, 352, 324, 323, 504, 506 आणि 34 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे आणि पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे यांच्याकडे देण्यात आला. भाग्यनगर पोलीसांनी अत्यंत प्रभावी मोहिम राबवून या महिलेसह तिच्या चार मित्रांना अटक केली आहे. या पुढे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात कार चालकाचे नाव प्रकाश श्रीरामे यांना माहित नाही तसेच या प्रकरणातील मार्गदर्शक कोण आहे हे शोधल्यानंतर आणखी बरेच सत्य समोर येतील. 15 आणि 10 वर्षांची बालके यांचा नैसर्गिक पालनकर्ता पिताच असतो असा कायदा आहे. पण कोणाच्या तरी चुकीच्या मार्गदर्शनात या महिलेने आपल्या प्रियकर आणि इतर तीन मित्रांसोबत नबऱ्याला किडनॅप करून केलेेले कृत्य निंदनियच आहे.
गुन्हा करतांना महिलेला कायदा म्हणजे खेळ वाटला आणि तिचे मार्गदर्शक आणि सहकारी याबाबत तिला अंधरात ठेवून हे कृत्य करायला गेले परंतू भाग्यनगर पोलीसांनी अत्यंत फिल्मीस्टाईलमध्ये घटनेचा छडा दोन तासामध्ये लावला आणि सर्वांना गजाआड केले.
नवऱ्याला किडनॅप करणारी महिला प्रियकर आणि तीन मित्रांसह गजाआड