नवीन नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील मोहसीन कॉलनी येथे 30 नोव्हेंबरच्या रात्री मारहाण झालेल्या दोघांपैकी एक युवक मरण पावला आहे. या गुन्ह्यात तक्रार देताना युवकाने आपण जातीने बौद्ध असल्याचे तक्रारीत लिहिले. या प्रकरणात जखमी झालेले दोघेही अनुसूचित जातीचे आहेत. तरी सुध्दा गुन्हा दाखल करताना मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे या गुन्ह्यात जोडलेली नाहीत. कायदा माझ्यापेक्षा सर्वात मोठा आहे असे म्हणून कायदा मोठा होत नसतो. तर त्यासाठी कायद्याने सांगितलेल्या घटनांना पूर्णपणे अंमलात आणावे लागते तेव्हाच कायदा मोठा होतो.
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी अक्षय साहेबराव जमदाडे वय 20 हा आपल्या एका मित्राला वाचवताना झालेल्या हल्ल्यात आता अमोल चावरे हा मरण पावला आहे. या गुन्ह्याची तक्रार अक्षय साहेबराव जमदाडे यांनी लिहिताना मी जातीने बौद्ध आहे आणि राहणार धनेगाव आहे असे लिहिले आहे. या गुन्ह्यात दोन युवकांवर जीव घेणा हल्ला झाला. पोटात खंजर मारल्याने अमोल चावरे मरण पावला आहे. या गुन्ह्याची तक्रार देतांना अक्षयने शेख सोहेल उर्फ तलवार भाई शेख युनूस राहणार रहमत नगर हैदराबाद, ऑटो चालक शेख मजहर शेख युसुफ राहणार पाकीजा नगर आणि शेख सोहेल शेख अनवर राहणार धनेगाव नांदेड अशी तीन जणांची नावे दिली आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा क्रमांक 706/2022 भारतीय दंड संहितेतील कलम 307, 326 ,504 आणि शस्त्र कायद्यातील कलमे जोडली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम या कायद्याची कलम 135 जोडली आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील आणि त्यातील शिक्षा ही 10 वर्ष किंवा त्या पेक्षा असेल आणि त्यातील फिर्यादी व्यक्ती हा अनुसूचित जातीचा असेल तर त्या गुन्ह्यांमध्ये ऍट्रॉसिटी कायदा जोडणे अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयात मूळ प्रकरण सिद्ध झाले तर त्या मूळ गुन्ह्यातील जेवढी शिक्षा आहे तेवढीच शिक्षा ऍट्रॉसिटी कायद्यात प्रदान करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तक्रारदार अक्षय साहेबराव जमदाडे यांनी फिर्याद लिहितानाच आपण बौद्ध जातीचे असल्याचा उल्लेख केलेला आहे. तरीपण अत्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्रमांक 706 मध्ये ऍट्रॉसिटी कायदा सोडलेला नाही. काय कारण असेल याचे? कोण घेणार याचा शोध? आणि ऍट्रॉसिटी कायदा न जोडणाऱ्या विरुद्ध काय होणार कार्यवाही या प्रश्नांची उत्तरे अत्यंत दुर्मिळ आहेत. पोलीस ठाण्यातील प्रत्येक गुन्हा पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने दाखल झाला असे एक वाक्य प्रत्येक एफ आय आर मध्ये लिहिलेले असते. आता तर अमोल चावरे यांचा मृत्यू झाला आहे. आता या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 302 वाढवावे लागेल. कमीत कमी हे 302 कलम वाढवताना तरी नांदेड ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यात ऍट्रॉसिटी कायद्याची कलमे जोडावीत तर कमावले.