नांदेड(प्रतिनिधी)-21 नोव्हेंबर रोजी गोदावरी नदी काठी स्वप्नील नागेश्र्वर या युवकाचा खून करणाऱ्या कटातील 7 जणांची 9 दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर यातील एक पोलीस कोठडीच्या दरम्यान काही दिवस उपचार घेण्यासाठी दवाखान्यात भरती झाला होता. त्या एकाची पोलीस कोठडी तीन दिवसांसाठी वाढवून दिल्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी दिले आहेत.
21 नोव्हेंबर रोजी एक महिला आणि एक युवक अशा दोघांना काही जणांनी ऍटोमध्ये कोंबून नदीकाठी आणले. त्या ठिकाणी त्या महिलेची बेअब्रु सुध्दा केली आणि स्वप्नील नागेश्र्वरचा तर खूनच केला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्वरीत प्रभावाने सात जणांना अटक केली. त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे खूनाची घटना घडविण्यात आणखीनही बरेच जण सामील आहेत. त्याचा शोध अजून सुरू आहे. पकडलेल्या सात जणांची नावे शहबाज खान एजाज खान (24), मोहम्मद सद्दाम मोहम्मद साजीद कुरेशी(20), मोहम्मद उसामा मोहम्मद साजीद कुरेशी (20), शेख एयान शेख इमाम(20), सोहेल खान साहेब खान (19), सय्यद फरहान साहील सय्यद मुमताज (19) आणि उबेद खान युनूसखान पठाण (23) अशी आहेत. न्यायालयाने 22 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत या सात जणांना पेालीस कोठडी दिली होती.

आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सात जणांना न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडी मागितली. या सात जणांमधील एक शहबाज खान एजाज खान रा.पक्कीचाह नांदेड हा पोलीस कोठडीदरम्यान काही दिवस उपचारासाठी रुग्णालयात दाखल होता. या आधारावर शहबाज खान एजाज खान याची पोलीस कोठडी न्यायालयाने तीन दिवस अर्थात 6 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवून दिली आहे.
महिलेला कधी मिळेल न्याय?
स्वप्नील नागेश्र्वरचे खून प्रकरण तपासासाठी पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या हातात आहे. चंद्रसेन देशमुख यांची कागदोपत्री काम करण्याची मोठी ख्याती आहे. पण आजपर्यंत स्वप्नील नागेश्र्वरसह महिलेची झालेली बेअब्रु, तिचा बनवलेला आक्षेपार्ह व्हिडीओ याबाबत मात्र कार्यवाही झालेली नाही. जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे की, महिलांवर होणारे अन्याय आणि त्यावरील उपाय फक्त व्यासपीठावर बोलले जातात काय? त्यापेक्षा महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे आणि त्यांनीया प्रकरणातील महिलेला न्याय द्यावा अशी चर्चा होत आहे.
संबंधीत बातमी…..
https://vastavnewslive.com/2022/11/24/स्वप्नील-नागेश्र्वरच्य-2/