नांदेड(प्रतिनिधी)-विहिरीत पडून मरण पावलेल्या एका 48 वर्षीय व्यक्तीबाबत दाखल झालेला आकस्मात मृत्यू आता त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार खूनाच्या स्वरुपात बदलला आहे.
दि.1 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8 वाजता मौजे रेखातांडा शिवारातील बालाजी केंद्रे यांच्या शेतातील विहिरीत लक्ष्मण पांडूरंग राठोड (48) यांचे प्रेत सापडले. त्यावेळी कंधार पोलीसंानी याबाबत आकस्मात मृत्यू क्रमांक 65/2022 दाखल केला. याबाबत 3 डिसेंबर रोजी मरण पावलेले लक्ष्मण पांडूरंग राठोड यांच्या आई रेखा पांडूरंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 डिसेंबर रोजी त्यांचा मरण पावलेला मुलगा लक्ष्मण पांडूरंग राठोड यास लक्ष्मण भाऊराव चव्हाण (47) रा. पोमातांडा ता.कंधार यांनी आठ दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून विहिरीत ढकलून खून केला आहे.कंधार पोलीसांनी आता या प्रकरणी गुन्हा क्रमांक 369/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कंधारचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
