
नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीची आज सुट्टीच्या दिवशी सुध्दा दखल घ्यावी लागली. आज वाजेगाव परिसरात नायब तहसीलदार सौ. स्वामी, मंडळाधिकारी जोंधळे, अनेक तलाठी आणि महसुल विभागातील पथकाने जुना पुल, वाजेगाव येथे नदीपात्रातून वाळु उपसा करणाऱ्या लोकांवर कार्यवाही करत त्यांचे तराफे जाळल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. पण ते तराफे खऱ्या अर्थाने तेच आहेत काय? की, आता वाळू माफियांच्या कामाचे नसलेले तराफे आहेत याची माहिती प्राप्त झाली नाही.

काल दि.3 डिसेंबर रोजी वास्तव न्युज लाईव्हने शहरातील वाजेगाव परिसरात अर्थात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्राचा सत्यानाश करणाऱ्या वाळू माफियांविरुध्द कार्यवाही व्हावी अशा आशयाची बातमी प्रसिध्द केली होती. गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्यातून अनेक गैरप्रकार घडतात, नदीमधील वाळून काढल्याने खड्डे पडतात आणि मग अपघात घडतात त्यामुळे या अवैध वाळू उपसावर कार्यवाही व्हावी अशी विनंती वास्तव न्युज लाईव्हने आपल्या बातमीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. आज 4 डिसेंबर, रविवार, सुट्टीचा दिवस असतांना सुध्दा वास्तव न्युज लाईव्हच्या वृत्ताची दखल महसुल प्रशासनाने घेतली.नायब तहसीलदार सौ.स्वामी, मंडाथधकारी जोंधळे यांच्यासह महसुल प्रशासनातील अनेक लोकांनी वाजेगाव परिसरात अनेक तराफे जाळल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामध्ये ते तराफे आता वाळू माफियांच्या गरजेचे नसतात असे नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या नारीकांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले. तराफ्यांचा वापर होतांना तराफ्यांची एका विहित मुदतीनंतर गरज संपते. मग ते तराफे सांभाळून ठेवले जातात असे सांगण्यात आले आणि अशी कार्यवाही होते तेंव्हा बिनकामाचे तराफे जाळण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात आणि चांगले तराफे बाजूला ठेवले जातात अशी माहिती या भागात राहणाऱ्या नागरीकांनी दिली. दोन दिवसांपुर्वी कोणी तरी एका महिला अधिकाऱ्याने दोन अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले होते अशी चर्चा आज वाजेगाव परिसरात सुरू होती. पण ते दोन ट्रॅक्टर कोण्या तरी मातब्बर व्यक्तीचे असल्यामुळे काही वेळानंतर ते ट्रॅक्टर सोडून देण्यात आले असे या भागातील लोक सांगत होते.

आज असर्जन भागात सुध्दा एक वाळू वाहतूक करणारी हायवा गाडी पकडली गेली आहे अशी चर्चा सुरू आहे. ती हायवा गाडी कोणाची आहे, त्या गाडीचा क्रमांक काय आहे याची सविस्तर माहिती काढण्यात अपयश आले. तरी वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीची दखल सुट्टी असतांना रविवारी घ्यावी लागली हे तेवढेच सत्य आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2022/12/03/अभिजित-राऊत-साहेब-शहरात-न/