राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या फाउंडेशन लेव्हल दोन मध्ये औरंगाबादचा समर्थ विक्रम कदम नॅशनल चॅम्पियन

 

औरंगाबाद,(प्रतिनिधी)- दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी 19 वी एसआयपी नॅशनल अबॅकस 2022 स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण भारतातून 3800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. अबॅकसला मराठीत “सरकणाऱ्या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट” असे म्हणतात. पूर्वीच्या काळात आकडेमोड करण्यासाठी आज सारखे इलेक्ट्रिक कैलकुलेटर नव्हते. त्या काळात आकडेमोड करण्यासाठी अबॅकसचा उपयोग केला जात होता. अबॅकसचा उपयोग प्राचीन काळात नियर ईस्ट, युरोप, चीन आणि रुस मध्ये व्यापारी आकडेमोड करण्यासाठी करत. कॅल्क्युलेटर च्या जगात विद्यार्थ्यांची आकडेमोड करण्याची सवय कमी झाली असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनात गणिता विषयी भीती आहे. त्यामुळे अबॅकसमुळे विद्यार्थी अंकगणितात हुशार होतात एकाग्रता आणि स्मृति चा विकास होतो. आत्मविश्वास वाढतो.

काल्पनिक आणि व्हिज्युअलायझेशन शक्तीचा विकास होतो. तर्क शक्ती आणि विश्लेषण शक्तीचा पण विकास होतो.

एसआयपी अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा 2022 मध्ये समर्थ विक्रम कदमने फाउंडेशन लेवल दोनचा नॅशनल चॅम्पियन म्हणून क्रमांक पटकावला व तो फाउंडेशन लेव्हल दोन चा बेस्ट परफॉर्मर सुद्धा ठरला. समर्थ ॲड विक्रम कदम व ॲड प्रियदर्शनी कदम यांचा मुलगा असून तो मास्टर माइंड अबॅकस सेंटर एन 4 सिडको औरंगाबाद चा विद्यार्थी आहे व तो स्टेपिंग स्टोन हायस्कूलच्या चौथ्या वर्गात शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *