मुंबई – एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून आम्हाला वि दा सावरकर यांचे बद्दल मोठा आदर होता . तो कमी झाला कारण ब्रिटिशांना अनेक वेळा माफीनामा लिहून दिला, त्यांची पेन्शन घेतली. महात्मा गांधींच्या हत्येच्या कटामध्ये सहभाग होता. त्यापेक्षा आम्हा ब्राह्मणेतराच्या दृष्टीने सावरकर खलनायक दुष्ट तिरस्कारणीय वाटतात कारण त्यांनी वर्णव्यवस्थेचा खंबीरपणे पुरस्कार केलेला होता. ब्राह्मण श्रेष्ठत्व व आम्हा इतरांचे निचत्व त्यांना मान्य होते. ते त्यांना आणखी प्रबळ व शाश्वत करायचे होते म्हणून त्यांनी हिंदू सभेचे काम चालविले होते.
सावरकरांचे इतर दोष झाकून त्यांचा उदो उदो करणे याचा अर्थ त्यांनी पाठिंबा दिलेल्या वर्ण व्यवस्थेचे दोष झाकून तिचे समर्थन करणे व स्वतःला नीच हलका समजून जगणे होय . मला ते कोणत्याच कसोटीवर मान्य नाही
आपली जात ब्राह्मण आहे हे मान्य करणे म्हणजे उघड विषमता व शोषण याचे समर्थन करणे होय. निव्वळ धार्मिक कर्म कांडेकरून पोट भरणाऱ्या पुरोहिताबद्दल आपण समजू शकतो पण शिकली सवरलेली जागतिक प्रश्नावर सल्ला देणारी माणसे स्वतःला ब्राह्मण म्हणऊन घेतात तेव्हा त्यातील दोष त्यांच्या लक्षात येत नाहीत? का ते स्वतः दुर्लक्ष करतात? की दुर्लक्ष करणे ही त्यांच्या दृष्टीने नैसर्गिक प्रक्रिया ठरते? की मानसिक दृष्ट्या अबोध मनातील प्रतिक्रिया ठरते?
खांडेकरच नव्हे तर विविध क्षेत्रातील ब्राह्मण वर्ण /जात मानणारांचे विचार असेच एकांगी व कडवे आहेत . असा कडवेपणा कशामुळे येतो?
26/ 11 मुंबई हल्ला घटनेतील मुख्य आरोपी अजमल कसाब यासह त्या काळात महाराष्ट्रात पकडल्या गेलेल्या बहुतेक मुस्लिम अतिरेक्यांशी मी चर्चा केली होती .त्यावेळी भारतीय हिंदू बद्दल त्याचे एवढे कडवे व द्वेषपूर्ण मत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला?
जन्मतः माणसाच्या मेंदूची पाटी कोरी असते मग त्यावर असं काही लिहिता येतं का? हो. त्यासाठी जगाला चकित करणारा प्रयोग मानसशास्त्रज्ञ पावलाने केला ‘पावलावज डॉग’ या नावाने तो जगप्रसिद्ध आहे. भुकेल्या कुत्र्यासमोर अन्न ठेवले की त्याची लाळ गळायला लागते. घंटेचा आवाज केला तरी लाळ गळत नाही. पावलावणे एका कुत्र्याच्या तोंडात लाळ ग्रंथीला नळी जोडून तिचे टोक बाहेर काढले. भुकेल्या कुत्र्याला अन्न दाखविले की त्या नळीतून लाळ बाहेर पडताना दिसे. शेजारी बांधलेली घंटा कितीही वेळा वाजवली तरी लाळ बाहेर येत नसे.
पावलावणे थोडा बदल केला. भुकेल्या कुत्र्याला अन्न देण्या अगोदर तो घंटा वाजवत असे आणि मग लगेच अन्न देत असे. ही क्रिया त्याने अनेक दिवस चालवली. घंटा वाजली अन्न मिळाले. घंटा वाजली अन्न मिळाले. सतत चालू. घंटेचा आवाज आणि अन्न मिळणे या गोष्टी पावलावणे त्या कुत्र्याच्या मेंदूमध्ये एकमेकांशी जोडून घेतल्या . पुढे प्रयोगात थोडासा बदल केला. घंटा वाजवली पण अन्न दिले नाही तरीही कुत्र्याच्या तोंडातून लाळ बाहेर येऊ लागली. त्यालाच पावलाने ‘कंडिशनिंग’ असे म्हटले. कुत्र्याच्या नकळत व नियंत्रणाशिवाय ही क्रिया घडू लागली . या प्रयोगाने मानवी विचारसरणीला मोठा हादरा दिला . मला भेटलेल्या फेसबुक मित्रा पैकी अनेक लोकांवर ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे ‘सोशल कंडिशनिंग’ झालेले आहे. माणूस(homo sepien) म्हणून आम्ही व ब्राह्मण जैविकदृष्ट्या समान आहोत कारण साठ लाख वर्षांपूर्वी चिंपांझी माकडीन ही आम्हा सर्वांची एकच आजी आहे. तरी हिंदू म्हणून धार्मिक अधिकार दृष्ट्या असमान असतो . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचे घरामध्ये जे संस्कार संगोपन(upbringing)होते त्यामध्ये सूक्ष्म पातळीवरचा परंतु खूप मोठा फरक असतो . तो फरक आजच्या ब्राह्मणांच्या पूर्वजांनी आमच्या धर्मग्रंथामध्ये घुसडलेला आहे. तो कसा ते नंतर पाहू . ब्राह्मण हे इतरांपेक्षा कसे श्रेष्ठ असतात हे विचार, कृती, सूचना, व कर्मकांडातून राजीव खांडेकर व गोतावळ्यावर बिंबवले जाते ते सामान्य माणसाला दिसत नाही समजत नाही ही खरी शोकांतिका आहे. आपण सुद्धा या संस्काराचे बळी आहोत हे खांडेकर व गोतावळ्याच्या लक्षात येत नाही. ब्राह्मण शब्द असलेल्या माझ्या पोस्टवर पुढील फेसबुक मित्रांनी नाके मुरडली होती त्यांना मी विचारले की तुम्ही ब्राह्मण कसे, का, केव्हा, झाला याबद्दल मत दिले तर बरे होईल. पण कोणीच मत मांडले नाही.काहींनी मला ब्लॉक केले सामाजिक चळवळीतील विश्वंभर चौधरी, हेरंब कुलकर्णी, उल्का महाजन, मेधा पाटकर, पत्रकारितेतील सतीश कामत, गिरीश कुबेर, प्रदीप उमरीकर, बर्दापूरकर राजकारणातील रत्नाकर महाजन, अजित अभ्यंकर वगैरे. सक्षम समाज निर्मितीसाठी खरे तर या लोकांनी बोलायला हवे . कालबाह्य संस्कार फेकून देऊन ‘डी कंडिशनिंग’ व्हायला पाहिजे.
ज्या ब्राह्मण घरामध्ये समानता माणुसकी कृतज्ञता या मूल्यावर संस्कार व संगोपन केले जातात ती मुले वेगळा विचार करतात.आमचे एक फेसबुक मित्र प्रकाशजी परांजपे निवृत्त न्यायाधीश यांच्या लिखाणावरून ते लक्षात येईल.
इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा वर्ण व्यवस्था जात वास्तव हे इथल्या मागासलेपणाचे प्रमुख कारण आहे . ही वर्ण व्यवस्था अशीच राहावी यासाठी शिकले सवरलेले वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे स्वतःला ब्राह्मण म्हणून घेणारे लोक मुख्यता जबाबदार आहेत असे माझे निरीक्षण आहे आणि मी ते परिस्थितीजन्य अभ्यासावरून सिद्ध करून दाखवणार आहे!
-सुरेश खोपडे