नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासलीवाल कॉम्प्लेक्स टिळकनगर येथे विमानतळचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे त्यांच्या नेतृत्वात २ कॉफी शॉप मालकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.या पुढे कॉफी शॉपमध्ये मोकळे,ओपन टेबल लावण्याची तंबी त्यांना देण्यात आली आहे.
शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात १ अधिकारी,१ महिला पोलीस अंमलदार,६ पोलीस अंमलदार यांनी टिळकनगर भागातील एक आणि आनंदनगर मधील राजमहल इमारतीतील १ अश्या दोन ठिकाणी छापे मारले.त्यात पोलिसांना अश्लील वर्तन करतांना काही जोड्या सापडलेल्या. तेव्हा विमानतळ पोलिसांनी त्या २ कॉफी शॉप मालकांना तंबी ठेवून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगितले.तसेच दुकानात केबिन न ठेवता मोकळ्या जागेमध्ये टेबल लावण्यास सांगितले आहे.दोन्ही कॉफी शॉप मालकांवर विमानतळ पोलिसांनी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे.
