नांदेड(प्रतिनिधी)-प्रज्ञासुर्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज त्यांच्या निळ्या जनसागराने तसेच इतरांनी सुध्दा त्यांना अभिवादन करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
नांदेड शहरासह जिल्ह्यात आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रिज लागली होती. कोणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर कोणी अभ्यासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर कोणी अन्नदान केले अशा विविध स्वरुपात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जनसागराने आपल्या भावना त्यांच्या चरणी अर्पण केल्या.
सायंकाळी विविध भागातून आंबेडकर जनतेने पणतीज्योत रॅली काढून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. आजच्या अभिवादन सोहळ्यात काही घडबड होवू नये यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भरपूर मेहनत घेतली.


‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीमध्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रामध्ये दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, डॉ. अजय टेंगसे, संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. मलीकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, हुशारसिंग साबळे, मेघश्याम सोळंके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, दिगंबर तंगलवाड, रामदास पेदेवाड, रवि मोहरीर यांच्यासह डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, उध्दव हंबर्डे,शिवराम लुटे, काळबा हनवते, सुनिल रावळे, सुनिल ढाले, विलास साळवे, लीना कांबळे, कविता गुरधाळकर, चंद्रकला हनवते, बोराळे राजासाहेब, प्रमोद हंबर्डे, हरीश पाटील, नारायण गोरे, संतोष हंबर्डे, व्यंकटी हंबर्डे, लक्ष्मीनारायण पेरुका यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
देगलूर-प्रज्ञा सूर्य, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकोपयोगी अभियानास याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अभियानात शहरातील पुढारी कार्यकर्ते पोलिस अधिकारी पत्रकार प्राध्यापक शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार फुलेंना वाहता एक वही एक पेन देऊन महामानवास अभिवादन केले.
दरम्यान देगलूर शहरात विकास नरबागे यांच्या पुढाकाराने सातत्याने गेली चार वर्षापासून एक वही एक पेन वाहून आदरांजली वाहण्यात येत आहेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज सकाळपासूनच त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध मान्यवरांनी गर्दी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार फुले व मेणबत्ती न वाहता एक वही एक पेन या अभियानास प्रतिसाद देऊन या सामाजिक उपक्रमात हातभार लावला .यामुळे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना याचा सतत चार वर्षापासून फायदा होत आहे तर शहरातील सर्व जाणते व प्रतिष्ठित नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभागी होऊन एकही एक पेन वाहिली यावेळी आयोजक विकास दरबागे यांच्या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल कौतिक करीत त्यांना या व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील सर्व मान्यवर पुढारी नेते कार्यकर्ते पत्रकार प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते युवक युती विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते