नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि कास्य पदक जिंकणाऱ्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील तीन शार्प शुटरांचा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज सन्मान केला. भविष्यातील भारतीय स्तरावर होणाऱ्या पोलीस नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभकामना पण दिल्या.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस अंमलदार शंकर भारती, ज्ञानोबा चौंडे, हनुमंत पाखलवार आणि केशव अवचार असे पथक महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत पुणे येथे सहभागी झाले होते. या स्पर्धेत शंकर भारती यांनी 15 मिटर पिस्टल स्कॉटींग पोझीशन या प्रकारात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरे ज्ञानोबा चौंडे यांनी पिस्टल स्नॅप फायर या नेमबाजी प्रकारात कास्य पदकावर आपले नाव कोरले. नेमबाजी स्पर्धेत पुण्यातील एक पथक आज नांदेडला आले.महाराष्ट्र पोलीस दलात नांदेड जिल्हा पोलीस दलाचे नाव गाजवून आलेल्या या पथकाने आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेवून आपण जिंकलेली पदके आणि प्रमाणपत्र त्यांच्यासमोर सादर केली.
श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या शार्प शुटर पोलीस अंमलदारांचा सन्मान करून भविष्यातील भारतीय नेमबाजी स्पर्धेत सुध्दा उत्कृष्ट कामगिरी करून तेथे सुध्दा प्रथम क्रमांक मिळवा अशा शुभकामना दिल्या. महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या शार्प शुटर शंकर भारती यांची महाराष्ट्र पोलीस संघात निवड झाली आहे. भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा जानेवारी 2023 मध्ये तामिळनाडू राज्यात होणार आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेे यांनी शार्प शुटरांचा केला सन्मान