नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सुर्यनगर भागात घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चैतन्यनगर भागात सुध्दा एक घरफोडून चोरट्यांनी ए.सी. चोरला आहे. देगलूर शहरात एका घरातून चोरट्यांनी 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.भुतन हिप्परगा ता. देगलूर येथे एका घरातून चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
सुर्यनगरमध्ये राहणारे दिलीप तुकाराम खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 डिसेंबरच्या मध्यरात्री 12.30 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या घराचा कुलूप कडीकोंडा तोडून कोणी तरी घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे.
चैतन्यनगर भागातील शासकीय कार्यालय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मध्ये 2 डिसेंबरच्या दुपारी 4 ते 5 डिसेंबरच्या दुपारी 4 वाजेदरम्यान कोणी तरी गोडाऊनचा कोंडा तोडून त्यातील 4 हजार 980 रुपये किंमतीचे वातानुकुलीत यंत्र चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जुनगरे अधिक तपास करीत आहेत.
देगलूर शहरातील शारदानगरमध्ये राहणारे दिनेश संघनाथ मुगिलवार यांच्या घरात चोरट्यांनी 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर या दरम्यान त्यांच्या अनुउपस्थितीचा फायदा घेवून घरातील टी.व्ही. गॅस सिलेंडर, टेपरेकॉर्ड, कापड, चांदीचे दागिणे आणि सोन्याची नथ असा 38 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
भुतन हिप्परगा ता.देगलूर येथील आत्माराम संजय भुताळे यांच्या घरात कोणी तरी दि.1 डिसेंबरच्या सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान गच्चीवर चढून पायऱ्यांनी खाली आला आणि कुलूप तोडून पेटीत ठेवलेले 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरून नेले आहेत. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दिपक एकनाथराव शिंदे यांची 14 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 2 डिसेंबर रोजी विजया बार, लातूर फाटा येथून चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते अधिक तपास करीत आहेत.
चार घरफोड्या; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी