नांदेड(प्रतिनिधी) -नांदेड जिल्हा पोलीस दलातील दहा सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरिक्षक अशी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच पोलीस हवालदार पदावरील 102 जणांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे हे आदेश नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 7 डिसेंबर रोजी निर्गमित केले आहेत.परंतू पदोन्नतीच्या तयार यादीवर आक्षेप मात्र घेण्यासाठी पोलीसांना वेळ मिळालेला नाही. या यादीमध्ये आपल्यानंतर पोलीस झालेले अनेक जण आपल्या अगोदर पदोन्नती घेत आहेत असे दु:ख नांदेड जिल्हा पोलीस दलातील लोकांना आहे.
राज्य पोलीस दलातील पोलीस नाईक हा संवर्ग मृत संवर्ग घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेमध्ये पदोन्नतीचा लाभ कर्मचाऱ्यांना देतांना दहा सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरिक्षक पदबहाल करण्यात आले आहे. या सर्वांना 25 फेबु्रवारी 2022 पासून हा लाभ प्राप्त होणार आहे. पदोन्नती प्राप्त श्रेणी पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांचे नियुक्ती ठिकाण लिहिले आहे. पदोन्नती प्राप्त करून त्यांनी त्या जागी काम करायचे आहे.नारायण गणपत कदम-लोहा, सुधाकर व्यंकटराव देवकर-शहर वाहतूक शाखा, दतु बाबासाहेब मुंडे-नियंत्रण कक्ष, जमीर ईरशाद अहेमद खान-मनाठा, भास्कर व्यंकटराव कराड-पोलीस मुख्यालय, सिध्दार्थ हिरामण जोंधळे-तामसा, रशिद खान मुर्तुजा खान पठाण-मुदखेड, इक्रामुल्ला अहमद मुल्ला सय्यद-जीपीयु, विद्यासागर विठ्ठलराव वैद्य-भारत नागोराव झुंजारे-किनवट असे आहे.
102 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ही पदोन्नती देतांना 50 वर्षांचे वय त्यांनी संगणकाचे घेतलेले ज्ञान आदी बाबींना सेवाज्येष्ठतेसह जोडणयात आले आहे.यादीमध्ये पोलीस नाईक असणारे सुध्दा पोलीस अंमलदार आहेत. त्यांची नावे आणि नेमणुक पुढील प्रमाणे आहे. शामसिंह रामसिंह पवनठाकूर, शिवराम विश्र्वंभर टरके, कोमल इरबाजी तेलंग, महम्मद असलम महम्मद हनिफ-जिल्हा विशेष शाखा, रंगराव वसराम राठोड-सुदाम किशनराव ठाकरे-हिमायतनगर, भारत गबरु राठोड, बालाजी मुंजाजी पवार, सुप्रिया गंगाधर टोम्पे-आर्थिक गुन्हे शाखा, भगवान किशन पवार, रमेश हुलबाराव नामपल्ले-वाहतुक विभाग, शिवराज हवगीराव सोलापुरे, बापूराव तुळशीराम जाधव-कंधार, गणेश बाबुराव दाबनवाड, मोनाली नरेंद्रराव अंचेवार, राजू माधवराव पांगरेकर, गोविंद भुंजगराव कदम, अभय गोविंदराव जाधव, उज्वला संभाजी सदावर्ते-शहर वाहतुक शाखा, विजय रामहरी तोडसांब, पुष्पा शामराव अतराम, आशिष वसंतराव पिल्लेवार-लिंबगाव, संजय हनमंतराव सांगवीकर, मैनुमियॉं मदारशहा, संदीप गणपतराव मंडलवार, प्रशांत मनोहररराव थोरात, जगननाथ परमेश्र्वर अनंतवार, क्रांती मोतीराम गायकवाड, राजनंद केरबा कांबळे, गजानन सदा भालेराव, संतोष नामदेवराव भोसले, प्रविण रघु सुरनर, संग्राम माधवराव धुलगंडे, दिनेश परेश्र्वर पांडे, वाजिद मंजुर अहेमद शेख, संजय भगवानराव हंकारे, दिपक दादाराव डिकले, सुनिल संभाजी होळकर, चित्रा जळबाजीराव बनसोडे, संगीता ज्ञानोबा श्रीमंगले, सुनिल श्रीराम पारधे, रणविर दिगंबर राठोड, राजेश मुंजाजी पारडे –पोलीस मुख्यालय, संगीता भीवराजजी गुरूपवार , रामप्रसाद एकनाथ परडे, नारायण किशन कदम,-लोहा, गणेश रामदास तालकोकुलवार, गजानन रतनसिंह चव्हाण, शिवाजी पंढरीनाथ पवार, शिवभक्त संभाजी रामोड, सचिन मारोती गायकवाड –लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, वनुनाथ परमेश्र्वर अनंतवार, अमित रोहिदास हिरे-एटीएस.संतुका जयसिंग इबितदार-बिलोली, संजय नारायण जोंधळे, सिताराम रानबा खरोडे,गजानन श्रावण डुरके,-किनवट– शंकर गणपती नलबे, प्रल्हाद संभाजी इमडे, मोहन माधवराव झुंजारे, बालाजी व्यंकटराव कोंडावार, शिवाजी रामकिशन कानगुले –नांदेड ग्रामीण, सुनिल बळीराम आडे, किर्तीकुमार प्रल्हाद रणविर, परमेश्र्वर निवृत्ती भिसे, दिपक विश्र्वनाथ जाधव-हदगाव, गजानन दिगंबर किडे, माधव नागरोव मरीकंटलू, प्रदीप विठ्ठलराव खानसोळे, सुरेखा भिमराव पाटील –वजिराबाद, अफजल खान मोहम्मद खान पठाण, दिपक रघुनाथराव ओढणे, हेमवती माधवराव भोयर-स्थानिक गुन्हे शाखा, सुनिला गोपीनाथ वाघमारे, ज्योती व्यंकट स्वामी पोना, शांता नरहरी कनुरे, मुदसर काझी नजर अब्दुल लतिफ –इतवारा, अनामिका किशनराव जगताप-पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना, पप्पू जयहिंद चव्हाण, राजकुमार किशन कांबळे, पुष्पेषकुमार शंकरराव नरवाडे-अर्धापूर , जिजाबाई गोविंद तेलंगे-नियंत्रण कक्ष, संगीता नरहिरराव पांचाळ- महिला कक्ष, पांडूरंग नारायणराव पाळेकर, बलविंदरसिंघ दशरथसिंह ठाकूर,गुलाम समदानी गुलाम एजदानी –मुदखेड, आशिष सुभाष डगवाल-माहूर, सुनिता देवराव कुडमेथे, जहिरोद्दीन अर्षफोद्दीन फारुखी-विमानतळ, विलिन विश्र्वंभर गिरे-गुप्त शाखा किनवट, महारुद्र देविदासराव लोहार, लियाकत जैनोद्दीन शेख-शिवाजीनगर, बालाजी गंगाधर पांचाळ, जावेद सलीम शेखसुनिल लहुदास कदम, राजकिरण गोविंद सोनकांबळे-देगलूर, शेख अब्दुल बारीमहम्मद शरीफ, कासीम रसुल शेख, बालाजी मच्छींद्र पुरी, –मरखेल, मधुकर गणेशराव हंबर्डे, प्रदीप संभाजी गर्दनमारे-भाग्यनगर,वर्षा नामदेवराव पवार-मनाठा, संतोष किशन निलेवार, मारोती रामराव मस्के-महामार्ग बारड, सतिशकुमार लक्ष्मण श्रीवास्तव- महामार्ग अर्धापूर, बालाजी परमेशु नागमवार-धर्माबाद, महम्मद अब्दुल निसार अब्दुल मतीन, व्यंकटेश आनंदराव चिंचारे-विशेष सुरक्षा विभाग असे आहेत.
पदोन्नतीमध्ये थोडी खुशी थोडा गम…
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या पदोन्नतीमुळे एकीकडे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. परंतू या विरुध्द पोलीस दलात असा असंतोष पण आहे की, दिलेल्या पदोन्नत्यांमध्ये काही जणांवर अन्याय झाला आहे . आपल्यापेक्षा आपल्यानंतर पोलीस झालेल्या लोकांना आपल्या अगोदर पदोन्नती मिळाली अशी खंत पोलीस विभागातूनच व्यक्त होत आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हा घोळ मिटवावा अशी रास्त भावना पोलीस विभागातून व्यक्त होत आहे.