नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागातील अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात 3110 तलाठी आणि 518 मंडळाधिकारी अशी एकूण 3628 पदे निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
26 एप्रिल 2016 रोजी तलाठी सज्जा पुर्नरचना समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील या पुर्नरचनेच्या संदर्भाने तयार करण्यात आलेल्या एका आलेखानुसार महसुल विभाग, जिल्हा तलाठी साझे आणि महसुली मंडळे यांची पुर्नरचना करण्यात आली आहे. त्यात कोकण- तलाठी पदे 550, मंडळ अधिकारी पदे-91, नाशिक विभाग तलाठी पदे-689, मंडळ अधिकारी पदे-115, पुणे-तलाठी पदे-602, मंडळ अधिकारी पदे -100, औरंगाबाद-तलाठी पदे-685, मंडळ अधिकारी -114, नागपूर तलाठी पदे-478, मंडळ अधिकारी-80, अमरावती तलाठी पदे-106, मंडळ अधिकारी-18 अशी ही एकूण तलाठ्यांची 3110 पदे आणि मंडळ अधिकाऱ्यांची 418 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील 36 जिल्हानिहाय पदे पुढील प्रमाणे आहेत त्यात पहिला आकडा तलाठी पदांचा आहे. दुसरा आकडा महसुल मंडळे आहेत.पुणे-331-55, सातारा-77-12, सांगली-52-09, सोलापूर-111-19, कोल्हापूर-31-05, अमरावती-34-06, अकोला-08-01, यवतमाळ-54-09, बुलढाणा-10-02, वाशिम-00-00, नागपूर-94-16, चंद्रपूर-113-23, वर्धा-50-08, गडचिरोली-114-19, गोदिंया-49-08, भंडारा-38-06, औरंगाबाद-117-19, जालना-80-13, परभणी-76-13, हिंगोली-61-10, बीड-138-23, नांदेड-84-14, लातूर-39-07, उस्मानाबाद-90-15, नाशिक-175-29, नंदुरबार-00-00, धुळे-166-28, जळगाव-146-24, अहमदनगर-202-34, मुंबई-19-04, मुंबई उपनगर-31-03, पालघर-86-16, ठाणे-72-10, रायगड-140-22, रत्नागिरी-103-18, सिंधदुर्ग-99-18 अशी ही नवीन पदनिर्मिती आहे. राज्य शासनाने हा पदनिर्मितीचा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202212061736126019 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
राज्य शासनाने 3110 तलाठी पदे आणि 518 मंडळ अधिकारी पदे निर्माण केली