नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे बिलोली येथे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या बिलोली कालावधीतील तीन वर्ष पुर्ण करण्यासाठी 14 दिवस शिल्लक असतांना त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आनंदा नरुटे हे शिवाजीनगर पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्षात आले होते. 24 डिसेंबर 2019 रोजी बिलोली पोलीस ठाण्यात शिवाजी डोईफोडे यांची नियुक्ती झाली होती. त्यापुर्वी ते नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत होते.
3 वर्षाचा कालखंड पुर्ण होण्याअगोदर शिवाजी डोईफोडे यांना नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे आणि नियंत्रण कक्षातील आनंदा नरुटे यांना बिलोली येथे पाठविले आहे. हे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
