नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर, अर्धापूर, धर्माबाद पोलीस ठाणे होणार रिकामे
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलात आता एप्रिल-मे-2022 पर्यंत होणार नाहीत अशा चर्चा सुरू होत्या पण आज पोलीस महासंचालक रजनिश शेट यांच्या मान्यतेने आणि आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार पोलीस महासंचाल कार्यालयाने राज्यातील पोलीस निरिक्षक-225, प्रतिक्षा यादीत पोलीस निरिक्षक-32, सहाय्यक पोलीस निरिक्षक-335 आणि पोलीस उपनिरिक्षक-84 अशा 676 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या आदेशावर पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांची स्वाक्षरी आहे.
आज 9 डिसेंबर रोजी जारी झालेल्या पोलीस निरिक्षक, प्रतिक्षेतील पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांच्या वेगवेळ्या याद्यांमध्ये एकूण 676 नावे आहेत. त्यात पोलीस निरिक्षकांच्या एकूण 225 बदल्या करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातून जाणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नावे-सध्याची नियुक्ती कंसात नवीन नियुक्ती अशा क्रमाने लिहिले आहेत. संजय भिमाशंकर हिबारे-धर्माबाद (अ.ज.प्र.त.स.नांदेड), गजानन धोंडीबा सैदाने-नियंत्रण कक्ष(नाशिक ग्रामीण), लक्ष्मण विश्र्वनाथराव राख-नियंत्रण कक्ष(बीड), अशोक तुकाराम जाधव-अर्धापूर (अमरावती ग्रामीण), सुधाकर भाऊसिंग आडे-भाग्यनगर (वाशिम) असे आहेत. याबदल्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे धर्माबाद, भाग्यनगर आणि अर्धापूर रिकामे होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात येणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत त्यांची नावे आणि जुने नियुक्तीचे ठिकाण या क्रमाने लिहिले आहे. बबन गंगाराम कऱ्हाळे-यवतमाळ, रमेश चिमाजी वाघ-मुंबई शहर, जयप्रकाश काशीनाथ गुट्टे-बॉम्ब शोधक व नाशक पथक नांदेड, मनिषा मंगेश कदम-अ.ज.प्र.त.स.औरंगाबाद यांची नियुक्ती अ.ज.प्र.त.स.किनवट जि.नांदेड येथे करण्यात आली आहे.सुर्यमोहन नारायण बोलमवाड-मुंबई शहर यांच्यासह नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या परभणी जिल्ह्यात येणारे पोलीस निरिक्षक सुभाष लच्छमन्ना अनमुलवार-नाशिक ग्रामीण हे आहेत. सोबतच परभणी जिल्ह्यात राज्य गुप्तवार्ता विभागातील नियुक्तीच्या प्रतिक्षेतील बुध्दीराज ज्ञानोबा सुकाळे यांची नियुक्ती झाली आहे.
पोलीस निरिक्षकांच्या यादीतील 32 पोलीस निरिक्षकांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये मागे नांदेड जिल्ह्यात कार्यरत पोलीस निरिक्षक प्रदीप गिरजीनाथ तिदार यांचे नाव आहे.सोबतच परभणी जिल्ह्यातील संदीपान सोन्याबापू शेळके यांचेही नाव आहे. या यादीत एकूण 32 जणांची नावे आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने बदली केलेल्या राज्यभरातील सहाय्यक पोलीस निरिक्षकांची संख्या 325 आहे. त्यात नांदेड पोलीस परिक्षेत्रातून 11 सहाय्यक पोलीस निरिक्षक दुसरीकडे जाणार आहेत तर नांदेड पोलीस परिक्षेत्रात 7 सहाय्यक पोलीस निरिक्षक येणार आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्रातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या पोलीस निरिक्षकांची नावे त्यांचे सध्या नियुक्तीचे ठिकाण आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण अशा क्रमाने लिहिले आहेत. दिनेश दिगंबर सोनसकर-नांदेड(गडचिरोली), राजकुमार पद्माकर पुजारी-परभणी (औरंगाबाद शहर), प्रविण पंडीतराव सोमवंशी-परभणी (नागपूर शहर), राहुल धनसिंग बहुरे-लातूर, अण्णासाहेब रामराव पवार-नांदेड, विलास शहराजी नवले- लातूर, अनिल गजेंद्र लांडगे-हिंगोली, बाळू रघुनाथ गिते-नांदेड (सर्व मुंबई शहर), श्रीदेवी बळीराम पाटील-हिंगोली, शंकर गिताराम पांढरे- नांदेड(दोघे नागपूर शहर), श्रीनिवास गंगाराम रोयलावार-हिंगोली(विशेष सुरक्षा विभाग).
नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. सोपान सोनाजी चिट्टमपल्ले-नागपूर, वामन बापूराव बेले-औरंगाबाद शहर, विशाल विठ्ठलराव शहाणे-बीड, श्रीकांत ग्यानोबा किरवले, हनुमंत उध्दव भिंगारे-मुंबई, आजीनाथ भिमराव पाटील, राजू गोपाळराव चव्हाण-सर्व मुंबई शहर येथून आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने एकूण 84 पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातून जाणारे पोलीस उपनिरिक्षक तीन आहेत त्यांची नावे आणि नवीन नियुक्ती अशा क्रमाने लिहिली आहेत. संतोष दत्तात्रय गिते-औरंगाबाद परिक्षेत्र, शरद विजयकुमार घोळके-कोल्हापूर परिक्षेत्र, राजू अशोक मोरे-महामार्ग सुरक्षा पथक, नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणारे 7 पोलीस उपनिरिक्षक आहेत. त्यांची नावे आणि जुने नियुक्तीचे ठिकाण अशा क्रमाने लिहिले आहेत. राजेश नारायणराव डाकेवाड-चंद्रपूर, सुरेश काशिराम पोगुलवार-मुंबई शहर, गणेश मोतीराम मुपडे-अमरावती ग्रामीण, पंकज सुभाषराव ढोके, शेख अयुब शेख हिराजी-अमरावती शहर, होणाजी संघनाजी चिरमाडे-ठाणे शहर, आनंद नामदेवराव श्रीमंगल-गडचिरोली असे आहेत.
वाचकांच्या सुविधेसाठी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांच्या बदली आदेशांच्या तीन पीडीएफ संचिका बातमीसोबत जोडल्या आहेत.
पोलीस निरिक्षक यादी..
ce9025c292459762c468b02e5fa829af
सहाय्यक पोलीस निरिक्षक यादी …
b3d018ce0cc91032c9ccf846bf0b7cfd
पोलीस उपनिरिक्षक यादी..