नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या आसपास रेल्वे स्थानक रस्त्यावरील मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या एका भाविकाच्या दुचाकी डिक्कीतून चोरट्यांनी 3 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे.
खोजा कॉलनी येथील चॉंद मस्जिदजवळ राहणारे महमंद मकबुल सलीम हे आज शुक्रवार दिवशीची नमाज पठण करण्यासाठी वेळेप्रमाणे दुपारी रेल्वे स्थानक रस्त्यावरील मस्जिदमध्ये आले होते. त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डब्ल्यू.0974 ही मस्जिदबाहेर उभी केली होती. प्रार्थना करून परत आल्यावर त्यांनी डिक्की उघडून पाहिले असता त्यात ठेवलेली 3 लाख रुपये रोख रक्कम कोणी तरी चोरट्यांनी लांबवली होती.
घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक वृत्तलिहिपर्यंत त्या ठिकाणीच होते. आसपास असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून पोलीस प्रयत्न करत आहेत. दिवसा ढवळ्या झालेली ही तीन लाख रुपयांची चोरी पोलीसांसाठी एक आव्हान आहे.
रेल्वे स्थानक रस्त्यावरून दुचाकीतील 3 लाख रुपये चोरले; पोलीसांना दिवसाए आव्हान