नांदेड(प्रतिनिधी)-जनावर चोरी करणाऱ्या एका वाहनाने 10 डिसेंबरच्या पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास पोलीस पथकावर हल्ला केला. त्यात एक पोलीस जखमी झाले आहेत. परवाच नांदेड ग्रामीण पोलीसांनी सुध्दा गाढवे चोरणाऱ्या टोळीतील चार संशयीतांना रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यांचे पुढे काय झाले हे समजू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून चोरीचे जनावरे जात आहेत असा संशय आल्याने वसमत पोलीसंानी त्या गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला. पण जनावर चोरांनी पोलीसांच्या गाडीवर दगडफेक करून पसार झाले. पोलीसंानी त्याचा पाठलाग करून त्या जनावर चोर वाहनाला लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्यावेळी वसमतचे पोलीस उपनिरिक्षक बाबासाहेब खारडे आणि त्यांचे सहकारी गस्त करत होते.
खारडे आणि त्यांचे सहकारी या वाहनाचा पाठलाग करत आले तेंव्हा ते वाहन आसेगाव-लिंबगाव रस्त्यावर उभे होते. त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनी पोलीसांवर दगडफेक केली. त्यात एक पोलीस अंमलदार जखमी झाला आहे. पोलीसांनी सरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. ते वाहन पुढे आसेगाव-निळा-लिंबगावकडे पळून गेले. वसमत पोलीसांनी पुन्हा त्या वाहनाचा पाठलाग केला. तेंव्हा ते वाहन आडवे झालेले दिसले. या गाडीत चार गायी एक वासरु अशी जनावरे आढळली. गाडी पलटी होताच जनावर चोर पळून गेले. या पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.