नांदेड(प्रतिनिधी)-आमच्याकडे काय बघतोस असे बोलत दोन जणांनी एका 18 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
दि. 7 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास अन्ससिंघ गुरमितसिंघ संधू (18) हा युवक विजयनगर सिडको भागात एका दुकानासमोर आपल्या मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी इतर मित्रांसोबत आलेला होता. त्यावेळी सिडको भागातील अविनाश उर्फ भैय्या मिरासे आणि सौरव वाघमारे या दोघांनी तु आमच्याकडे काय बघतोस माझ्या ऐरीयात तुझी औकात नाही असे सांगत संधूला मारलाण केली आणि त्या बरगडीत आणि खंजीर खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा 10 डिसेंबर रोजी दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
आमच्याकडे बघतोस काय म्हणत जीवघेणा हल्ला