केदारगुड्डा ता.हदगाव येथील आदिवासी आश्रम शाळेतील घटना
हदगाव(प्रतिनिधी)-केदारगुड्डा ता.हदगाव येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत 9 वषाच्या बालिकेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आणि समाजाने या घटनेवर गंभीर विचार करण्याची गरज आहे. हा मुद्या समोर आला.
आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका 9 वर्षीय बालिकेने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी 12 डिसेंबर रोजी उघडकीस आला. ही बालिका आश्रम शाळेतील इयत्ता चौथी वर्गात शिकत होती. बालिकांच्या कक्षामधील उंच असलेल्या पलंगाला तिने गळफास लावून घेतला होता. काय असे झाले असेल की या 9 वर्षाच्या बालिकेला ज्यामुळे तिच्या मनात आत्महत्येचा विचार आला. तिला जग कळले होते काय आणि या दुर्देवी जगात ती राहु इच्छीत नव्हती काय? पण का या जगात ती राहु इच्छीत नव्हती याचे उत्तर शोधणे महत्वपुर्ण आहे. आत्महत्या केलेल्या बालिकेच्या दोन बहिणी याच आदिवासी वस्तीगृहात राहुल शिक्षण घेतात.सोमवारी दुपारी या दोन बहिणी आल्या तेंव्हा त्यांच्या कक्षाचे दार आतून बंद होते. तेंव्हा त्यांनी बंद असलेल्या दरवाज्याची माहिती शाळेच्या व्यवस्थकांना दिली. तेंव्हा दरवाजा तोडून पाहिले असता त्या बालिकेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आसपासच्या गावांमध्ये बालिकेच्या आत्महत्येची माहिती पसरली तेंव्हा खुप मोठा जनसमुदाय केदारगुड्डा येथे जमला. मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले आणि नंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली.
आत्महत्या झालेल्या बालिकेची माहिती आदिवासी समाजात पसरली आहे. आदिवासी समाजात याबद्दल तिव्र भावना व्यक्त होत आहेत. मनाठा पोलीस या बद्दलचा सखोल तपास करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नऊ वर्षाच्या बालिकेची आत्महत्या अनेक प्रश्न निर्माण करते?