नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक या परिसरांना रात्रीच्या काळात र्निमनुष्य केल्यामुळे बऱ्याच गुन्हेगारीवर नियंत्रण आले आहे. पण आज सुरु असलेला हा घटनाक्रम कायम राहावा तर सर्वसामान्य माणुस नेहमीच सुरक्षीत राहिल.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेडला हजर झाल्यावर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मी सन 2013 मध्ये 15 दिवस नांदेडचा पोलीस अधिक्षक होता. त्या काळातील माझा नांदेड जिल्ह्याचा अभ्यास भरपूर आहे. त्यांचा उपयोग करून आणि पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाला ईतिहासातून वर्तमानात आणत. मी नवीन पध्दतीने काम करणार आहे आणि माझ्या कामातून सर्वसामान्य माणुस जास्तीत जास्त आनंदी कसा राहिल यासाठी प्रयत्न करणार आहे.

आपण सार्वजनिक रित्या दिलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्यक्षात काम सुध्दा केले. अनेक रात्र त्यांनी स्वत: जागून नांदेड शहरात गस्त केली. ते गस्त करत आहेत म्हणून पोलीस ठाण्यातील प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक पोलीस अंमलदार सदैव जागृक राहिला. या अभ्यासादरम्यान पोलीस अधिक्षकांनी एक सुंदर बाब हेरली. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक या परिसरात रात्री वावरणाऱ्यांना आवर घालण्याची गरज ओळखली. कारण शहरातील रेल्वे स्थानक आणि बसस्थानक हे दोनच परिसर जवळपास रात्रभर सुरू राहतात आणि शहरातील प्रत्येक माणुस त्या ठिकाणी सहज पोहचतो. पोलीस अधिक्षकांनी या परिसरातील लोकांबद्दल चांगलीच कडक भुमिका घेतली आणि आजच्या परिस्थितीला रेल्वे स्थानक आणि बसस्थानक या परिसरात प्रवासी आणि त्यांचे नातलग या लोकांना सुरक्षा आहे पण या व्यतिरिक्त कोणी इतर माणुस दिसला तर त्यांचे स्वागत पोलीस छान करतात. आपले स्वागत होत आहे म्हणून चुकीचे काम करणारी मंडळी, गुन्हेगार मंडळी रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात रात्री वावरतांना दिसत नाही.
वजिराबाद पोलीस ठाण्यात रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरातून रात्रीच्या काळात आमच्या विरुध्द संपत्ती विषयक गुन्हे घडल्याची तक्रार येतच नाही आहे. याचाच अर्थ रात्रीच्या परिस्थितीमध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलेला बदल प्रभावी ठरलेला आहे. आज सुरू असलेली ही परिस्थिती मात्र कायम अंमलात राहिली तरच रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरातून जाणारा-येणारा सर्वसामान्य माणुस सुरक्षीत राहिल.
