अप्पर पोलीस महासंचालक ते पोलीस उप महानिरीक्षक या पदातील 30 अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पदस्थापना

निसार तांबोळी मुंबईला वाहतूक शाखेत

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यात प्रलंबित असलेल्या पोलीस बदल्या काल पुन्हा एकदा करण्यात आल्या. आपण पोलीस महासंचालक ते पोलीस उप महा निरीक्षक पदातील 30 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश राज्यातील गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी झाले आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांना अपर पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई असे पद देण्यात आले आहे. नांदेड पोलीस परीक्षेत अद्याप प कोणाचीही नियुक्ती झाली नाही त्यामुळे नांदेड पोलीस परीक्षेत असे कार्यालय रिकामेच राहिले आहे.

राज्यात 30 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन पदस्थापना देऊन बदल्या करण्यात आल्या आहेत. कंसात लिहिलेले ठिकाण अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती आहे. रितेश कुमार-अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई (पोलीस आयुक्त पुणे शहर), मधुकर पांडे अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे महाराष्ट्र राज्य (पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार), प्रशांत बुरडे – अपर पोलीस महासंचालक मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा (पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई), सदानंद दाते-पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार (अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक मुंबई), विश्वास नांगरे पाटील-पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई (अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य पदोन्नतीने), मिलिंद भारंबे-विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था (पोलीस आयुक्त नवी मुंबई पदोन्नतीने), राजवर्धन-सह पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), विनय कुमार चौबे-अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पद उन्नत करून), अमिताभ गुप्ता-पोलीस आयुक्त पुणे शहर (अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था), निकेत कौशिक-पदस्थापना प्रतीक्षेत (अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग),

विशेष पोलीस महानिरीक्षक पदातील पुढील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सत्यनारायण चौधरी-विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा मुंबई (पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई), निशित मिश्रा -विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई (पोलीस सह आयुक्त आर्थिक गुन्हे विभाग बृहन्मुंबई), प्रवीण पडवळ-पोलीस सह आयुक्त आर्थिक गुन्हे मुंबई (पोलीस सह आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई), लखमी गौतम-विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना पोलीस महासंचालक कार्यालय (पोलीस सह आयुक्त गुन्हे बृहन्मुंबई), एस जयकुमार-विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन पोलीस महासंचालक कार्यालय (पोलीस सह आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई), अंकुश शिंदे-पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (पोलीस आयुक्त नाशिक शहर), प्रवीण पवार-संचालक महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे-(विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र), सुनील फुलारी-विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग पुणे (विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र), शिरिष जैन-पदस्थापना प्रतीक्षेत (पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग).

पोलीस उप महा निरीक्षक पदातील पुढील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनिल कुंभारे-अपर आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई (अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई), परमजीत दहिया-पोलीस उपमा निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई (अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई), विनायक देशमुख-अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई (अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई), राजीव जैन-पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई (अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश मुंबई), नवीनचंद्र रेड्डी-पोलीस आयुक्त नागपूर शहर (पोलीस आयुक्त अमरावती शहर), आरती सिंह-पोलीस आयुक्त अमरावती शहर (अपर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस विभाग बृहन्मुंबई), महादेव चव्हाण-अपर पोलीस आयुक्त पुणे शहर (पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), निसार तांबोळी -पोलीस उप महानिरीक्षक नांदेड पोलीस परीक्षेत्र (अपर पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई), ज्ञानेश्वर चव्हाण-अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई (अपर पोलीस आयुक्त गुन्हे ब्रह्मण मुंबई), रंजन कुमार शर्मा-पोलीस व महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई (अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई).

काल दिनांक 13 डिसेंबर रोजी काढलेल्या या बदल्यांच्या आदेशात सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईक नवरे, बी. जी. शेखर, संजय दराडे, वीरेंद्र मिश्रा, विनीत अग्रवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभातकुमार आणि महेश पाटील आदी अधिकाऱ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांना बृहन्मुंबईच्या वाहतूक विभागात पाठविण्यात आले आहे. पण नांदेड पोलीस परीक्षेचा पदावर कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती प्राप्त झालेल्या दोन आदेशांमध्ये दिसत नाही.

वाचकांच्या सुविधेसाठी शासनाने केलेल्या बदल्यांच्या आदेशाच्या दोन पीडीएफ फाईल बातमी सह जोडल्या आहेत.

IPS Transfers (1)

IPS Transfers (2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *