नांदेड(प्रतिनिधी)- काल दि.13 डिसेंबर रोजी राज्याच्या गृहविभागाने अपर पोलीस महासंचालक ते पोलीस उपमहानिरिक्षक पदातील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. पण काही तासातच शासनाने एक आदेश पारीत करून त्यांना विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र या पदावर पाठविले. अमरावतीचे पोलीस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिणा यांना आता अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई या पदावर पाठविण्यात आले आहे.
जयंत नाईकनवरे यांची पोलीस आयुक्त नाशिक शहर या पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांना पाठविण्यात आले होते. जयंत नाईकनवरे यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. 30 आयपीएस अधिकारी बदल्यांचे आदेश पारी झाल्यानंतर काही तासांनी जयंत नाईकनवरे यांना पदस्थापनाच्या प्रतिक्षेत असतांना पदउन्नत करून विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती पोलीस परिक्षेत्र येथे पाठविण्यात आले आहे. अमरावती पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिणा यांना अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई या पदावर पाठविले आहे. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरतीसिंह आणि चंद्रकिशोर मिना हे पती-पत्नी आहेत. आरतीसिंह यांची बदली अपर पोलीस आयुक्त शस्त्र पोलीस बृहन्मुंबई या पदावर झालेली आहे.
