नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात दोन घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर शहरातील एक घरफोडून चोरट्यांनी 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
देगलूर येथील रहिवासी हनुमंत खंडू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 13 डिसेंबरच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांचे आणि दत्ता मारोती हाके यांचे घर चोरट्यांनी तोडून त्यातून टी.व्ही. सोन्या चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक पुनम सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील किरण आनंदराव करंडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते एसटी महामंडळात मेकॅनिक आहेत. दि.10 डिसेंबरच्या सायंकाळी 6 ते 13 डिसेंबरच्या सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान त्यांचे सईदनगर भोकर भागात असलेले घर चोरट्यांनी फोडले आणि त् यांच्या तिजोरीतून 27 हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिणे मिळून 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
देगलूर येथे दोन घर फोडून 2 लाख 70 हजारांची चोरी ; भोकर येथे एक घर फोडून 69 हजारांची चोरी