नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हयातील नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठीचा अर्ज आ.राम पाटील रातोळीकर यांनी दिल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय नांदेड आणि पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड यांच्याकडून त्या बाबतचा अहवाल मागवला आहे.
नांदेड जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य आ. राम पाटील रातोळीकर यांनी नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या अनुशंगाने पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबतचा अहवाल मागविण्यात आला होता. पण तो अहवाल वेळेत पोहचला नाही म्हणून पोलीस महासंचालकांचे उपसहाय्यक श्री.चं.इमडे यांनी 9 डिसेंबर रोजी नांदेडच्या पोलीस परिक्षेत्र कार्यालयाला आणि पोलीस अधिक्षक कार्यालयाला पत्र पाठविले आहे. हे पत्र स्मरण पत्र आहे. आता लवकरात लवकर नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या दृष्टीने वस्तुशिस्ती प्रमाणे आणि सुस्पष्ट अभिप्राय पाठविण्यासाठी सांगण्यात आले आहे. सन 2007 पासून नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय होणार याच्या चर्चा होत होत्या. आजही त्या चर्चा चर्चाच आहेत. परंतू नवीन अर्ज भारतीय जनता पार्टीचे आमदार राम पाटील रातोळीकर यंानी दिला आहे. राज्याचे गृहमंत्री पद भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात काही उजेड पडेल अशी अपेक्षा ठेवली तर ती चुक ठरणार नाही.
