नांदेड(प्रतिनिधी)- तीन युवक दरोडेखोरांनी पिंपळगाव महादेव शिवारात एका युवकाला लुटून त्याच्याकडील 1 लाख 86 हजार 934 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
दि.12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 5.15 अशा फक्त 15 मिनिटाच्या वेळात तीन युवकांनी त्याची लुट केली. साईनाथ धाराजी प्रेमलवाड हे मायक्रो फायनान्स पुर्णा रोड नांदेड येथे काम करतात. त्या दिवशी त्यांनी आपली वसुली करून परत येत असतांना पिंपळगाव महादेव पाटीजवळ ते एका खातेदाराची वाट पाहत थांबले असतांना त्यांच्या पाठीमागून एका नंबर नसलेल्या दुचाकीवर तीन युवक आले त्यांनी त्यांच्या तोंडावर लाल मिर्चीचे पावडर फेकले आणि खंजीर दाखवून त्यांच्याकडील 1 लाख 86 हजार 934 रुपये रक्कम असलेली बॅग चोरून नेली आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे अधिक तपास करीत आहेत.
पिंपळगाव महादेव शिवारात तिघांनी एकाची लुट करून 1 लाख 87 हजार रुपये पळविले