नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात चार जणांनी चोरी करून त्यातून 8 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर विमानतळ पोलीसांनी दाखल केला आहे.
नामदेव धोंडबाराव कदम रा. ओंकारेश्र्वरनगर तरोडा (बु) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 जून 2021 रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरात काही जण घुसले त्यांनी घरातून 25 तोळे सोन्याचे दागिणे, 50 हजार रुपये रोख रक्कम असा 8 लाख रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना त्यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीसांनी प्राथमिक वेळेत याची दखल घेतली नाही म्हणून नामदेवराव कदम यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने नामदेवराव कदम यांची बाजू ऐकून विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर विमानतळ पोलीसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणारे लोक धाराजी लक्ष्मण शिंदे (50), पुजा धाराजी शिंदे(22), संजय लक्ष्मण शिंदे(47) सर्व रा. लोणी (खुर्द) ता. अर्धापूर आणि मुंजाजी विठ्ठलराव बहाटे (62) रा.कासारखेडा जि. नांदेड अशा चार जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 453, 427, 380 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 419/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गौड यांच्याकडे देण्यात आला आहे.
