
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा एका युवकाकडून शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूस पकडले आहेत. या युवकाचा सदानंद देशमुख खुन प्रकरणात सुध्दा आरोपी म्हणून समावेश आहे.
दि.14 डिसेंबर रोजी रात्री शिवाजीनगर गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार गस्त करत असतांना दत्तनगर भागातील रस्त्यावर साई दिपकसिंह गहेरवार (22) रा.बाबानगर नांदेड हा युवक भेटला. शिवाजीनगर पोलीसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्तुल लावलेले होते आणि त्याच्याकडे तीन जिवंत काढतूस सापडले. पोलीसांनी दाखवलेल्या किंमतीप्रमाणे या बनावट कावठी पिस्तुलाची किंमत 40 हजार रुपये आणि तीन जीवंत काढतूसांची किंमत 1500 रुपये आहे. मागील तीन दिवसांमध्ये शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने दुसरे पिस्तुल पकडले आहे. दोन दिवसांपुर्वी पकडलेला युवक सुध्दा गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खून प्रकरणातील आरोपी होता. आज पकडलेला साई गहेरवार हा सुध्दा तीन वर्षापुर्वी बाबानगरमध्ये झालेल्या सदानंद देशमुख खून प्रकरणातील आरोपी आहे. सध्या तो जामीनीवर आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रवि शंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे,विष्णु डफडे आदींचे पिस्तुल पकडलेल्या चांगल्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
