राहुलभाऊ सोनसळे आयोजित भिमगितांच्या कार्यक्रमात अनेकांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-धम्मचक्र परिवर्तन दिन विश्र्वरत्न, प्रजासुर्य डॉ.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकरनगर येथे झालेल्या कार्यक्रमात आयोजक राहुलभाऊ सोनसळे यांनी अनेक मान्यवरांचा सन्मान केला. भदंत पय्याबोधीजी यांनी त्रिशरण पंचशील घेवून कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमात धम्मदिक्षा लातूरकर आणि त्यांच्या संचाने भिमगितांचा कार्यक्रम केला. कार्यक्रमाचा समारोह राष्ट्रगिताने करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा.राजू सोनसळे, इंजि.राज अटकोरे, इंजि.प्रशांत इंगोले, प्रतिक मोरे यांचा समावेश होता.
दि.17 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास डॉ.आंबेडकरनगर येथील राहुलभाऊ सोनसळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सुरूवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत आणि त्यांच्या नंतर घडलेल्या अनेक घटनांवरील भिमगिते धम्मदिक्षा लातूरकर आणि त्यांच्या संचाने सादर करून उपस्थितांची वाह.. वाह.. मिळवली.


या कार्यक्रमात आंबेडकरवारी विचारांच्या मार्गावर चाललेल्या अनेकांचा सन्मान केला. त्यात एन.डी.गवळी, ऍड.आर.जी.परळकर, रामप्रसाद खंडेलवाल, ऍड.स्वप्नील कुलकर्णी, ऍड.अविनाश भोसीकर, प्रविण जेठेवाड, शिवानंद सूरकुंटवार, माधव जमदाडे, अविनाश पाटील, ईलियास पाशा राजूरकर, राहुल गवारे, कैलास सावते, सुरेश रावणगावकर, राहुल चिखलीकर, निशाताई विजय सोनवणे, मोनिकाताई सुनिल मोरे, विजयमाला नरवाडे, भाऊराव भदरगे, सुभाष काटकांबळे, कॉ.गंगाधर गायकवाड, आकाश रुपक जोंधळे, डॉ.विलासराज भद्रे, विजय शितळे, शांताबाई धुताडे, रवि गायकवाड, नंदकुमार बनसोडे, बी.बी.पवार, ईश्र्वर सावंत, ऍड.यशोनिल मोगले, डॉ.विकास वाठोरे, करणसिंह बैस, शंकर शिंगे, दिगंबर मोरे, धम्मदिक्षा सरोदे यांचा समावेश होता.
राहुलभाऊ सोनसळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांची संख्या भरपूर मोठी होती. धम्मदिक्षा लातूरकर यांनी सादर केलेल्या भिमगितांना मिळालेला प्रतिसाद अनेकांच्या अश्रुंमधून दिसला. अशा कार्यक्रमांमुळे आपल्या जीवनातील मागचा ईतिहास जो आपल्याला माहित नव्हता तो माहित होतो अशी प्रक्रिया अनेकांनी दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनात राहुल चिखलीकर, रुपेश सोनसळे, आकाश जोंधळे, राहुल घोडजकर, भिमा पोहरे, अतिश ढगे, अभय सोनकांबळे, भिमराव बुक्तरे, महेश पंडीत, महेश खंडागळे, रितेश गुळवे, साई पाटील, ऋषभ महादळे, मारोती डोईबळे, अमर जोंधळे, नवनाथ वाकोडे, गौरव जोंधळे यांनी महत्वपूर्ण भुमिका वठवली.
पुरस्काराचे मानकरी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *