मनुष्य जीवनात सोबत घेवून जाण्याची कोणतीच सोय उपलब्ध नाही. परंतू जीवनाच्या आठवणी या कायम ठेवण्यासाठी बऱ्याच कारणांना वाव असते. अशीच अनेक कारणे अनेक जणांच्या मनात सोडून नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी आज सायंकाळी आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी रवाना होत आहेत. आपल्या जीवनातील दारे त्यांनी आपल्या पोलीस कामगिरीची अनुभवातून उघडली आहेत. भावी पोलीस जीवनासाठी आणि संपूर्ण जीवनासाठी वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने त्यांना शुभकामना..

शिक्षक दिन अर्थात माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचा जन्म दिन त्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर 2020 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी नांदेड पोलीस क्षेत्राचा कार्यभार सांभाळला आणि त्या दिवसापासून कालपर्यंत अर्थात 20 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांनी आपल्या कामाला दिलेला न्याय हा जीवन हा प्रवास आहे. आपण मानल तर ती मौज आहे नाही तर दररोज समस्या आहेत. या शब्दांप्रमाणे जीवनातील प्रत्येक क्षणाला त्यांनी आपल्या कामकाजात आणून पोलीस विभागाला न्याय दिला. 4 जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आणि चार अपर पोलीस अधिक्षक तसेच त्यांचे सर्व सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार असे जवळपास 5 हजार पेक्षा जास्त लोकांचे कुटूंबप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली तेंव्हा मोठ्या-मोठ्या शब्दांवर विश्र्वास ठेवण्याऐवजी छोट्या-छोट्या भावनांना समजून घेतलं. कारण आपण लाख मोलाचे हिरे परिधान केले तरी ते पाहण्यासाठी मात्र आपल्याला 20 रुपयांचा आरसाच खरेदी करावा लागतो. ही बाब माहिती असल्यामुळे त्यांनी आपल्या 5 हजार पेक्षा जास्त कुटूंबियांसोबत उत्कृष्ट संवाद साधून आपल्या कामाला हळूहळू पुढे नेले. त्यांनी लोकांना भावनेने जिंकले. त्यांनी त्रासाला प्रेमाने जिंकले. त्यांनी आपमानाला आत्मविश्र्वासाने जिंकले, त्यांनी अपयशाला धिराने जिंकले, संकटांना धैर्याने जिंकले आणि माणसाला माणुसकीने जिंकले. ही पध्दत अंमलात आणतांना जिवनात त्यांना नांदेड पोलीस परिक्षेत्रातील त्यांच्या सेवाकाळाचे एकूण 846 दिवस भरपूर अनुभव देवून गेले.या कालखंडात खंडात त्यांनी आपल्या मागील जीवनातील पोलीस अनुभवांचा फायदा घेतला आणि 846 दिवसांमध्ये त्या अनुभवांच्या जोरावर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे कामकाज चालवले.
नांदेड पोलीस परिक्षेत्रातील सर्वात मोठे काम गुन्हेगारी नियंत्रणाचे, घडलेल्या गुन्ह्यांना उघडकीस आणण्याचे होते. त्यात त्यांनी फितुरांच्या खांद्यावर बंदुक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते हे ओळखले होते. म्हणून त्यांनी अनेक निष्ठावंत तयार केले आणि त्यातून गुन्हेगारांची शिकार केली. अत्यंत धैर्यशिल शब्दांमध्ये आणि वर्तनामध्ये त्यांनी अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल घडवून आणली. ज्यामध्ये समाजाला त्रास देणारे अनेक होते. तसेच युवकांना फसवून त्यांना नोकरी लावण्याच्या नावावर गंडवणारे अनेक होते. अशा सर्वांना त्यांनी गजाआड करायला लावले. आम्हीच या समाजाचे गाडीवान आहोत अशी खोटी समज बाळगुण समाजाला माहिती अधिकारांच्या अर्जावरून जेरीला आणणाऱ्यांसाठी मोठेच खंदक खोदले. एक माणुस म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगतांना त्यांनी अनेकांसमोर मी कसा आहे हे दाखवतांना समजण आणि समजून घेण यातला फरक मांडला. कारण समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागते.
त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्याशी जवळीक आलेल्या अनेकांना ही बाब समजली की, गुणवान मनुष्यासोबत राहुन सामान्य माणुस सुध्दा गौरव प्राप्त करतो. ज्याप्रमाणे एखाद्या फुलांच्या हारामध्ये असलेला धागा सुध्दा मस्तकाची जागा मिळवतो. या अनुभवातून अनेक जणांना त्यांच्यामुळे गौरव प्राप्त झाला. त्याच लोकांना आज असे वाटत आहे की, या जीवनाला मी पुर्णपणे वाचले आहे. पण निसार तांबोळी यांच्या बदलीमुळे त्या लोकांसमोर आता नवीन पान जीवनाचे सुरू झाले आहे. निसार तांबोळी यांनी दिलेल्या मार्गदर्शनातून ते सुध्दा सर्व यशस्वी होतील आणि पुढे जातील असे म्हणावेसे वाटते.
सोप नसत इतक.. सोप नसत इतक.. माझ्याशी बोलू नको म्हटल्यावर बोलण बंद करणं.. मनात उतरलेल्या व्यक्तीला मनातून उतरवणं सोप नसत इतक.. सोप नसत इतक ते सोबत घालवलेले दिवस विसरणं.. प्रत्येक क्षणाला त्या व्यक्तीच्या आठवणी वाचून राहण सोप नसत इतक…सोप नसत इतक ते क्षण विसरणं..प्रत्येक वेळी आपुलकीने एकमेकांना विचारण सोप नसत इतक…सोप नसत इतक काहीही न बोलता फक्त स्मित हास्य करणं.. सोप नसत इतक.. खरच.. सोप नसत इतक.
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये आता वाहतुक विभागाचे कामकाज निसार तांबोळी यांना सांभाळायचे आहेत. मुंबई शहरात त्यांनी अनेक पदांवर कामगिरी गाजवलेली आहे. ती कामगिरी आजही लोकांच्या लक्षात आहे. अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता त्यावेळी ते तेथेच होते. त्या दिवशी त्यांनी केलेली मेहनत आजही लोकांना त्यांची आठवण करून देते. भविष्याच्या पोलीस जबाबदारीत आणि भविष्याच्या संपुर्ण कालखंडात नांदेडकरांना आपली आठवण नक्कीच राहिल ती आम्ही एका कवि शब्दात व्यक्त करतो. ते शब्द असे आहेत की, “कोणीच कोणाच नसत असं फक्त म्हणायच असत, मनाच्या कोपऱ्यात तरीही कोणासाठी झुरायच असत.’ चंदनाला आपण स्वत: चंदन असल्याची घोषणा कधी करावी लागत नाही निसार तांबोळी साहेब कारण त्याचा सुगंध वाऱ्यासोबत आपोआप पसरत जातो या शब्दांसह निसार तांबोळी साहेबांना अलविदा….