नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील जय मल्हार वाईन मार्ट फोडून चोरट्यांनी 2 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
लोहा शहरातील रहिवासी किरण ज्ञानेश्र्वर हाके (32) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लोहा येथील जय मल्हार वाईन मार्टच्या पाठीमागील भिंत अज्ञात चोरट्यांनी दि.20 डिसेंबर ते 21 डिसेंबरच्या रात्री 10.33 वाजता फोडून आत प्रवेश करून दुकानातील गल्ला फोडून त्यातील नगदी 2 लाख 5 हजार रुपये व एक 10 हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर फोडून 2 लाख 15 हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाणे लोहा येथे गुन्हा क्रमांक 245/2022 नुसार कलम 457,380 दाखल करण्यात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक तांबे हे करीत आहेत.
लोहा शहरात वाईन मार्ट फोडून 2 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास