नांदेड(प्रतिनिधी)-वडगाव व वाजेगाव सज्जाचे तलाठी आज 2 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर गजाआड करण्यात आले आहेत.
एका तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या जमीनीच्या 7/12 कागदावर त्याच्या आईचे टोपन नाव समाविष्ट करण्यासाठी वाजेगाव व वडगावचे तलाठी माणिक काशीराम बोधगिरे (47) यांनी 3 हजार रुपयांची लाच मागितली. लाच रक्कमेबाबत तडजोड झाली आणि त्यांनी आज पंचासमक्ष 2 हजार रुपयांची लाच स्विकारली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना गजाआड केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक धर्मसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलीस निरिक्षक कालीदास ढवळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर, हनमंत बोरकर, अंकुश गाडेकर, अर्षद खान, ईश्र्वर जाधव, मारोती सोनटक्के आदींनी ही कार्यवाही पुर्ण केली. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्रमांक 9623999944,अशोक इप्पर, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड,मोबाईल क्रमांक – 9850483337,कार्यालय दुरध्वनी – 02262-253512, टोल फ्रि क्रं. 1064.