नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी भागातील पत्रांच्या गोदामांमध्ये संशयीत धान्य असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत तपासणी करून योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असे पत्र नायब तहसीलदार पुरवठा नांदेड यांच्या स्वाक्षरीने पोलीस निरिक्षक इतवारा यांना पाठविण्यात आले आहे.
पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे इतवारा यांनी 21 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाला पाठविलेल्या एका पत्राचा संदर्भ देवून हे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. माळटेकडी भागातील महंम्मद रिजवान महंम्मद खलील रा.रहेमतनगर यांचे पाच गोदाम आहेत. त्यात धान्याचा मोठा साठा आहे. याबाबत त्या ठिकाणी तांदळाचे 50 किलो वजनाचे 357 पोते आणि गव्हाचे 42 पोते सापडले आहेत. त्या धान्यातील एक किलोचे पाच स्मॅपल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सक्रतदर्शनी हे धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीमधले असल्याचे दिसते. पण कार्यवाही करण्याची जबाबदारी पुन्हा नायब तहसीलदार नांदेड यांनी पोलीस ठाणे इतवाराच्या पोलीस निरिक्षकांवर सोपली आहे. हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी इतवारा येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक गणेश घोटके यांच्याकडे देण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीची संपुर्ण जबाबदारी पुर्ण करण्याचे काम महसुल विभागाच्यावतीने केले जाते. परंतू या गोदामामधील धान्यावर कार्यवाही करण्यासाठी पुन्हा पोलीसांना पत्र पाठविण्यात आले आहे.