

बडनगर,(दीपक बढारढा)-भारत भरातील खांडल (खंडेलवाल) युवक-युवती परिचय संमेलनासाठी लोहार्गल धाम राजस्थान येथील सुर्यमंदिराचे पिठाधिश्र्वर महंत अवधेशाचार्यजी महाराजांनी शुभकामना देवून या कार्यक्रमाची सुरूवात केली. देशभरातून 112 युवती आणि 360 युवकांनी यात नोंदणी केली. ही बाब मात्र पुरूष आणि महिला समिकरणासाठी अत्यंत चिंताजनक आहे. परंतू मध्यप्रदेश खांडल विप्र संघटनेने या कार्यक्रमात जवळपास 3 हजार लोकांसाठी केलेली व्यवस्था दैदिप्यमान आहे.
मध्यप्रदेशातील खांडल विप्र प्रदेश संघटनेने या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले.या आयोजनात मध्यप्रदेश खांडल संघटनेचे अध्यक्ष संजय बसीवाल यांनी पुढाकार घेतला. या आयोजनात अखील भारतीय खांडल विप्र महासभेचे अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल, विप्र फाऊंडेशनचे संयोजक सुशिलजी ओझा यांच्यासह बनवारीलाल सोती, महाविर सोती, हरीप्रसाद रुथळा, मुरारीलाल गोरसीया, श्रीकांत पाराशर, जयनारायण रुथळा, अनिलकुमार नवहाल, रविशंकर झुनझुनोद्दीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
मध्यप्रदेश संघटनेचे अध्यक्ष संजय बसीवाल यांच्यासह सत्यनारायण माटोलीया, संजय भाटीवाडा, पुरूषोत्तम मिश्र, आशिष बणसीया, मनिष गोवला, देवेंद्र डिडवाणीया, अनिल बासीवाल, दिनेश दुबोलीया, मोना नवहाल, गोविंद चोटीया, रामनिवास नवहाल, पुनम चोटीया, मनिष जोशी, अशोक बसीवाल, राकेश भाटीवाला, मीना बासीवाल, चंदा सुंदरीया, सुरेश चोटीया, राकेश जोशी आणि संतोष पिपलवा हे परिश्रम घेत आहेत.

सर्व प्रथम महंत श्री अवधेशाचार्यजी महाराज यांच्या शुभ हस्ते वधू-वर परिचय संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भगवान परशुरामांचे पुजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या आशिर्वादपर शब्दात महंत स्वामी श्री महंत अवधेशाचार्यजी महाराज म्हणाले की, देशभरातून बडनगर येथे आलेल्या सर्वांना मी आशीर्वाद देतो. सोबतच लोहार्गल धामाची ऐतिहासीक पार्श्र्वभूमी सांगत तेथे भगवान परशुरामांनी आपल्याकडून झालेल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी लोहार्गल धाम भुमी निवडली होती. लोहार्गल येथे माघ महिन्यात सुर्यसप्तमी साजरी होते. त्यात आपण सर्वजण या असे निमंत्रण उपस्थितांना दिले.


विप्र फाऊंडेशनचे संयोजक सुशिल ओझा म्हणाले की, मी आजचा कार्यक्रम पाहुन काही शिकण्यासाठी आलो आहे. संघटन ही मजबुत स्थिती असते आणि विप्र समाजातील प्रत्येकाने एकजुटीने काम केल्यास संघटनेची ताकत वाढण्यास वेळ लागणार नाही. आजच्या जगात अभ्यास न करता भगवान परशुरामांचा ईतिहास बदलून दाखविला जात आहे. त्यासाठी विप्र समाजातील प्रत्येकाने अभ्यास करून त्याचे उत्तर दिले पाहिजे.ब्राम्हण आणि त्यांच्या कार्याबद्दल खोट्या वावळ्या उठवल्या जातात. त्या रोखण्यासाठी आम्हाला काम करता आले पाहिजे. जगातील 16 देशांमध्ये विप्र फाऊंडेशन या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यातून विप्र संघटनेला मजबुती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मध्यप्रदेश खांडल विप्र संघटनेचे अध्यक्ष संजय बसीवाल म्हणाले या युवक युवती परिचय मेळाव्यासाठी केलेले प्रयत्न फक्त प्रयत्न राहिले नाहीत तर ती चळवळ झाली. गावोगाव, प्रदेश-प्रदेश फिरुन युवक-युवतींची माहिती गोळा करण्यात आली आणि त्याद्वारे युवक-युवती संमेलनास आपो-आप मोठे स्वरुप प्राप्त झाले. सर्व खांडल समाजाच्या सहकार्यानेच हे घडले असे ते सांगत होते.
आजपर्यंतच्या युवक-युवती परिचय संमेलनापेक्षा अत्यंत वेगळा आणि सुनियोजित कार्यक्रम आखण्यात आला आहे. ज्यामध्ये युवक-युवतींना आणि त्यांच्या कुटूंबियांना एक दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी वेगळा कक्ष तयार करून देण्यात आला आहे. कोणत्याही युवक-युवतीला आपला परिचय व्यासपीठावरून देण्याची गरज नाही. परंतू या परिचय संमेलनातील नोंदणीनुसार 112 युवती आणि 360 युवक ही संख्या मात्र चिंताजनक आहे. यावर पुर्ण गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. मध्यप्रदेश खांडल संघटनेने तयार केलेल्या समारोहात जीवनाच्या परिक्षेत कोणते गुण प्राप्त होत नसतात परंतू आपण इतरांच्या हृदयात स्थान मिळवले तर तोच आपला खरा विजय असतो या शब्दांप्रमाणे त्यांनी आज जवळपास 3 हजार लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. ज्या प्रमाणे हलणाऱ्या दगडावर कशीच शेवाळ जमा होत नाही, वापरात असणाऱ्या लोखंडावर कधीच गंज लागत नाही. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती सतत प्रयत्नशिल असतात. त्यांना कधीच अपयश येत नाही या शब्दांप्रमाणे मध्यप्रदेश खांडल संघटनेने आपला सुगंध देशभर पाठवला आहे .
मध्यप्रदेश संघटनेने या ठिकाणी जेवनाची सोय करतांना प्लॉस्टिकचा वापर वर्जितच केला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाला जबाबदार प्लॉस्टिक न वापरता त्यांनी प्लॉस्टिक वापराशिवाय मोठे आयोजन करता येते हे दाखवले. पाणी पिण्यासाठी त्यांनी धातुचे तांबे वापरले आहेत.आपले दोन्ही हाता समाजाच्या मदतीसाठी मध्यप्रदेश खांडल विप्र संघटनेने पुढे ठेवले आहेत आणि एका उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आज 24 डिसेंबर आणि उद्या 25 डिसेंबर अशा दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आज सायंकाळी विप्र मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरुच होते. रात्री उपस्थितांसाठी कवि संमेलनाचे आयोजन निश्चित आहे. आज आणि उद्या दोन दिवस युवक युवती परिचय संमेलनात लग्नासाठी तयार असलेले युवक आणि युवती आणि त्यांचे पालक एक दुसऱ्याशी संवाद साधून आपल्या पाल्यासाठी जीवनाचा साथीदार निवडतील. ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन होते त्या-त्या ठिकाणच्या लोकांनी मध्यप्रदेश खांडल विप्र संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा बौध घ्यावा असा हा कार्यक्रम आहे.
अखिल भारतीय खांडल विप्र महासभेचे नुतन अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल यांनी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देशातील विविध ठिकाणी केले तर बऱ्याच समस्या समाप्त होतील असे सांगितले. देशभरातील खांडल विप्र सदस्यांसाठी अध्यक्ष या नात्याने माझ्यावर देण्यात आलेली जबाबदारी मी पुर्ण शक्तीलावून पुर्ण करेल असा विश्र्वास उपस्थितांना दिला.

