नांदेड(प्रतिनिधी)-एका कौटूंबिक प्रकरणातील पत्नीला खावटीसाठी न्यायालयाने आदेश केल्यानंतर ते पैसे न दिल्यामुळे जारी झालेल्या अटक वॉरंटमधील त्या नवऱ्याला भाग्यनगर पोलीसांनी मुंबईच्या मानखुर्द भागातून ताब्यात घेवून नंतर अटक करून न्यायालयासमक्ष त्याने 2 लाख 2 हजार रुपये भरले आणि त्याची सुटका झाली
नांदेड कौटुंबिक न्यायालयात घरगुती भांडण प्रकरणात तुकाराम बापूराव सावंत रा. मानखुर्द तांबे मुंबई याच्याविरुध्द कौटूंबिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार कमलाकर जायभाये आणि हनवता कदम यांनी तुकाराम बापूराव सावंतला 26 डिसेंबर रोजी मानखुर्द मुंबई येथे ताब्यात घेतले.27 डिसेंबरला तुकाराम सावंतला अटक करण्यात आली आणि आज दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याच्याकडून 2 लाख 2 हजार रुपये खावटीची रक्कम वसुल केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
खावटीचे 2 लाख 2 हजार भरल्यानंतर नवऱ्याची सुटका