नांदेड(प्रतिनिधी)-आज 27 डिसेंबर डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
आज पोलीस अधिक्षक नांदेड कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी पुष्पअर्पण करून डॉ.पंजाबराव देशमुख यांना अभिवादन केले. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते. सोबतच मंत्रालयीन अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी सुध्दा अभिवादन करण्यासाठी हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, शामका पवार, विनोद भंडारे यांनी उत्कृष्टपणे केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी