नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनातील भविष्य म्हणजे आपल्याकडे बंगले, गाड्या आणि मोठ्या भौतिक सुविधा असणे नव्हे. त्या भौतिक सुविधांना वापरणारी मंडळी किती समजदार आहे हे महत्वाचे आहे. म्हणूनच ती समजुतदार मंडळी तयार व्हावी म्हणून युवा नेतृत्व सन्मान योजना आम्ही तयार केली असून त्यातून देशासाठी आणि समाजासाठी आदर्श तयार व्हावी अशा बालकांचा सन्मान करण्याची ही योजना असल्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

इतवारा पोलीस ठाण्याच्यावतीने युवा नेतृत्व सन्मान समारोह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक गुणवंत, क्रिडा प्रकारातील यशवंत आणि सामाजिक कार्यात मेहनती व्यक्तीमत्व अशा युवकांचा सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम तेथे जमलेल्या युवक-युवतींना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर मान्यवरांनी प्रमाणपत्र दिले. याप्रसंगी पुढे बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले समाजाची प्रगती हवी असेल तर समाजातील युवा पिढी काय करते यावर आपले लक्ष असणे आवश्यक आहे. करीअर घडविण्यासाठी त्या युवक युवतीमधील पॅशन ओळखता आले पाहिजे आणि त्या पॅशनला हवा देण्याची गरज आहे. आज आम्ही ज्या युवक युवतींचा सन्मान करतो आहोत ती मंडळी पुढे समाजाचे आदर्श ठरावीत अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या प्रयत्नांना समाजातील प्रत्येकाने साथ द्यावी अशी माझी विनंती आहे. इतवारा पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम आम्ही सर्वत्र राबविणार आहो अशी माहिती सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना इतवारा येथील पोलीस निरिक्षक भगवान धबडगे म्हणाले भारतीय समाज सुदृढ करण्यासाठी युवकांनी प्रोत्साहित व्हावे म्हणून आम्ही या युवकांचा सन्मान करीत आहोत. वेळेअभावी आणि व्यस्ततेअभावी काही गुणवंत आज आले नाहीत परंतू आम्ही कायम स्वरुपी त्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले. या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे प्रतिभानिकेत शाळेचे मुख्याध्यापक डॉ.राजू पाटील दुडूकनाळे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी या युवक-युवतींना दिलेली सन्मानाची थाप त्यांच्या जिवनात मोठा बदल घडवेल. कारण या सन्मानाचा किती फायदा होतो याची जाणिव शिक्षक म्हणून मला जेवढी आहे ती इतरांना मिळणार नाही. युवक-युवतींना शाब्बास, छान, सुंदर असे शब्द उच्चारले तर ती त्यांच्यासाठी स्फुर्ती असते आणि तेच पुढे सक्षम भारत उभा करतील. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे म्हणाले की, इतर छोट्या व्यक्तींनी आपल्याकडून स्फुर्ती घ्यावी म्हणून आम्ही तुमचा सन्मान केला आहे आणि आपल्याला दिलेल्या शाब्बासकी आपल्या जीवनात यशाची कमान उंच उंच नेण्यासाठी मदत करणारी ठरावी या अपेक्षेनेच आम्ही तुमचा सन्मान केला आहे.
पोलीसांनी आज सन्मान केलेल्या युवक-युवतींमध्ये अफीया अन्सारी फिरदोस सलीम, लायबा अदीन मोहम्मद इब्राहिम, मुस्फिरा एैनी मो.शकील, नाझीया फातेमा, मुस्तफा खान, जैनब फातेमा अब्दुल खादर, रानीया सदफ युसूफ खान, सायमा तबसुम मोहम्मद शरीफ खुरेशी, सय्यद फातेमा सय्यद अखतर, अन्सारी मुशफिरा ताजमील शमीम अहेमद, आयशा कशफ अब्दुल मोईज, तुबा अरीन अब्दुल रहेमान, मुशरा महेक वासेसानी, सुमय्या फातेमा मोहम्मद अली चाऊस, फारेहा तसमीर एम.ए.हकीम, माहेरीन मोहम्मद फय्याज सिद्दीकी, बुशरा सालेहा रफीख, साजिदा बेगद अब्दुल रशिद, उशबा तहेरीन अब्दुल रहेमान फारुखी, फाखेहा अमरीन अब्दुल बशीर बेग, शेख निदा आफरीन शेख तारेख, अश्फिया अनम अब्दुल सत्तार, राहीन इरम मोहम्मद रफीक, श्रध्दा रामेश्र्वर सोनवळे, शिवशंकर केशव गुट्टे, एकनाथ मोकले, श्रेयश्री गोविंद पवार, अंकुश संतोष मानेकर, पायल दत्ता कुसूमकर, प्रतिक्षा चन्नप्पा अनंतवार, अभिनव पेंटाजी मुत्तेवार, आरती सुभाषराव बंडेवार, वैष्णवी बळवंत कुलकर्णी, शिवाजी वसंतराव मामीडवार, काजल नागोराव नरवाडे, अब्दुल रहेमान अब्दुल हबीब, मोअनस अफ्फान मो.मारुफ, मोहम्मद शाहेद खान खलील जई, बिलाल अब्दुल खयुम, आसीफ मोहम्मद फहीम, धिरज सुरेश पोरवाल, रोहन खुशाल भारसकर, दत्तकुमार मिश्री शर्मा, रुपम रितेशसिंह तेहरा, अभिनव संजयसिंह तेहरा, संकल्प मनिषसिंह पटेल, सर्व्हेश गजानन अंबेकर, प्रिती प्रविण गंधरघोल, श्र्वेता उमेश कोकुलवार, दुर्गा शिवशंकर शिरमेवार, गणराज विजय शिरमेवार, शेख नजीर शेख एकबाल, इस्लामुल हक उस्मानी, मोहम्मद अब्दुल रहेमान, शेख झैनुल मुसाफिक अहेमद, मोहम्मद जाकेर आदींचा समावेश आहे.