नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे सत्य शोधतात आशयाचे वृत्त “सत्य शोधक पोलीस निरिक्षकांनी महिलेचा अर्ज चौकशीवर ठेवला’ या मथळ्याखाली वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केले होते. या प्रकरणात वेगवेगळ्या चर्चा झाल्या. खाजगी गाडीत पोलीस अधिकारी एका व्यक्तीला शोधण्यासाठी पाठविण्यात आले. पण दरम्यान रविवारपासून श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब सुट्टीवर गेल्यानंतर सोमवारच्या रात्री या प्रकरणी महिलेवर गॅंगरेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणातील सत्य शोधण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
दि.13 डिसेंबर रोजी आशा नारायण सावळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 732 दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपी या सदरात नाव असलेल्या महिलेने या संदर्भाची दिलेली तक्रार ही अत्यंत भयंकर होती. त्यातील शब्द बातमीत प्रसिध्द करता येणार नाहीत असे आहेत. याप्रकरणात महिलेच्या पतीने पोलीस अधिक्षकांकडे सुध्दा तक्रार दिली होती की मला हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी पोलीस निरिक्षक अशोकराव घोरबांड साहेब धमक्या देत आहेत. या प्रकरणी एका पोलीस अंमलदाराचे बोलणे रेकॉर्ड करून महिलेच्या पतीने ते व्हायरलपण केले होते. त्यामध्ये तो पोलीस अंमलदार आणि तक्रारदार महिला हे एकाच गल्लीत राहतात यावरून त्या पोलीस अंमलदाराने 30 हजार रुपये घेऊन हे प्रकरण मिटवा असे शब्द त्या ऑडीओमध्ये आहेत. मात्र प्रकरण मिटलेच नाही. त्या ऑडीओमध्ये माझ्या पत्नीला मारहाण केली असेही शब्द आहेत. म्हणून मला तक्रार परत घ्यायची नाही असे पतीदेव त्या ऑडीओमध्ये सांगत आहेत.
या प्रकरणात अनेक घडामोडी झाल्या एका पोलीस अंमलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून रस्त्यावर आणणाऱ्या पण वाळूचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने यात पुन्हा नवीन मध्यस्थी केली. रविवार दि.25 डिसेंबरपासून साप्ताहिक सुट्टीला जोडून श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब काही दिवस सुट्टीवर आहेत. किती दिवसांची सुट्टी आहे याबद्दल मात्र माहिती मिळाली नाही.अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पुन्हा एका प्रकरणाला चर्चेत आणले गेले. त्यावेळी प्रभारी पोलीस निरिक्षक पोलीस ठाण्यात होते. काही लोकांनी आम्ही आताच जावून आत्मदहन करू असे सांगितल्यानंतर सुट्टीवर असलेल्या पोलीस निरिक्षकांनी खाजगी गाडीमध्ये पोलीसांच्याद्वारे त्या आत्मदहन करणाऱ्या माणसाचा शोध करण्याची सुरूवात केली.
पोलीस निरिक्षक नवीन होते. त्यांनी तुमची काय तक्रार आहे द्या असे सांगितल्यानंतर त्या महिलेने अगोदर दिलेल्या तक्रारीची जशीच्या तशी प्रत दिली आणि त्यावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गॅंगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा क्रमांक 775/2022 असा आहे. यात भारतीय दंड संहितेचे कलम 376(ड) आणि इतर कलमे जोडली आहेत. या प्रकरणातील सतता शोधण्याची अर्थात तपास करण्याची जबाबदारी इतवारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/12/17/सत्यशोधक-पोलीस-निरिक्षका/