नांदेड(प्रतिनिधी)-21 डिसेेंबर रोजी घडलेल्या चैनस्नॅचिंगचा गुन्हा शिवाजीनगर पोलीसांनी 27 डिसेंबर रोजी दाखल केला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकलवर जाणाऱ्या चोरट्यांनी एक मोबाईल बळजबरी चोरून नेला आहे. तसेच पोलीस ठाणे भाग्यनगर, इतवारा, नायगाव या हद्दींमधून 1 लाख 42 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
हनुमाननगर उमरखेड येथील महिला तृप्ती गजानन लंके पिलेवार या टिळकनगर नांदेडमध्ये राहतात. 21 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता दररोज प्रमाणे तृप्ती ह्या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी योगेश वट्टमवार यांच्या घरासमोरून जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर बसून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी व पेंडॉल 17 ग्रॅम 760 मिलीगॅ्रम वजनाचे बळजबरीने चोरून नेल आहे. या ऐवजाची किंमत 87 हजार हजार 466 रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गॅन्हा क्रमांक 453 प्रमाणे दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक माने यांच्याकडे देण्यात आला आहे.
डॉ.संदीप बाबूराव काळे हे 27 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास काबरानगर ते छत्रपती चौक असे पायी चालत असताना मोबाईलवर बोलत होते. त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांचा 28 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. भाग्यनगर पेालीसांनी हा गुन्हा क्रमांक 484 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक ननवरे अधिक तपास करीत आहेत.
वर्कशॉप कॉर्नरच्या पाणी टाकीजवळून 10 डिसेंबर रोजी महम्मद साबीरोद्दीन कुरेशी यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 483 नुसार दाखल केला आहे.
दि.26 डिसेंबर रोजी रात्री गोल्डन फंक्शन हॉल देगलूर नाका येथील पार्किंगमधून शेख अब्दुल शादुल्ला यांची 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. इतवारा पेालीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 358 नुसार नोंदवली आहे.
दि.30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान पिंपळगाव ता.नायगाव येथून कपील नागोराव डुमणे यांची 52 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. नायगाव पोलीसंानी ही घटना गुन्हा क्रमांक 191 प्रमाणे पोलीस दप्तरी दाखल केली आहे.
दोन जबरी चोरी त्यात एक चैन स्नॅचिंग; तीन दुचाकी चोऱ्या