नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद हायस्कुल अर्धापूर येथील प्रभारी मुख्याध्यापकाने खोट्या तक्रारी करणारा आरटीआय कार्यकर्ता, ब्लॅकमेलर संतोष वाघमारे विरुध्द गुन्हा दाखल करून दंडीत करावे तसेच खंडणीखोरापासून संरक्षण मिळावे असा अर्ज केला आहे. या अर्जात जिल्हा परिषद हायस्कुल शाळा येळेगाव ता.अर्धापूर येथील महिला मुख्याध्यापकाचे नाव सुध्दा आहे.
संतोष वाघमारे नावाच्या आरटीआय कार्यकर्ता महासंघ प्रतिनिधी या नावाने शासनाच्या वेबपोर्टलवर शेख महंमद वखीओद्दीन शेख हमीदोद्दीन प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कुल अर्धापूर आणि सौ.शेख वजात नौशीन शेख हमीदोद्दीन या जिल्हा परिषद हायस्कुल शाळा येळेगाव ता.अर्धापूर येथे कार्यरत आहेत. यांच्याविरुध्द ब्लॅकमेलर संतोष वाघमारे, दुसरा एक संतोष, अंकुश देसाई आणि आणखी एक ब्लॅकमेलर यांनी उलट सुलट खोट्या तक्रारी करून मागील चार वर्षापासून त्रास देत आहेत. दि.12 सप्टेंबर 2021 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी या दोघा मुख्याध्यापकांची चौकशी निर्धारीत केली. त्या चौकशीचा अहवाल आला. सोबतच जातप्रमाणपत्र पडताळणी समितीतील पोलीस निरिक्षक मुळे यांनी सुध्दा सर्वा अभिलेखांची तपासणी करून अहवाल सादर केला. या आरटीआय आणि ब्लॅकमेलर कार्यकर्त्यांनी शेख मोहम्मद वखीओद्दीन यांच्या वडिलांची सेवा पुस्तिका गायब केलाचा आरोप केला होता. पण ती सेवा पुस्तिका शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा केल्याच्या पावत्या आहेत. तरी ब्लॅकमेलर संतोष वाघमारे संतोष गुजलवार,नरवाडे आणि अंकुश देसाई चुडावकर यांनी आमची ब्लॅकमेलींग केली आहे. प्रशासनाकडून अनेक वेळा तपासणी झाली आहे. आमच्या दोषांचे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवलेली आहेत असे अर्जात नमुद आहे. या सोबतच माझ्या परिवाराला या गुंडांकडून संरक्षण मिळावे कारण हा त्यांचा धंदा आहे. खोटे अभिलेख तयार करायचे आणि त्यानुसार सामान्यांना खंडणी मागुन पैसे उकळायचे याची सविस्तर चौकशी केल्यास अनेक गुन्हे प्रकार समोर येतील असे अर्जात लिहिले आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी विनंती या अर्जात आहे. या अर्जासोबत दोन्ही मुख्याध्यापकांच्या झालेल्या चौकशीचा अहवाल जोडलेला आहे. अर्जाच्या प्रति पोलीस अधिक्षक नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, गटशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड, पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे अर्धापूर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर यांना दिल्या आहेत.