नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 ला निरोप आणि सन 2023 चे स्वागत होत असतांंना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येवू शकतो म्हणून पोलीस विभागाने मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हाभर तैनात केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील 31 डिसेंबरच्या तयारीत नांदेड शहरात अपर पोलीस अधिक्षक-1, पोलीस उपअधिक्षक-2, पोलीस निरिक्षक-8, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक-38, पोलीस अंमलदार 266, महिला पोलीस अंमलदार-55, आरसीपी प्लॉटून -4, एसआरपीएफ प्लॉटून-2, गृहरक्षक दल पुरूष-80, महिला-30. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी अपर पोलीस अधिक्षक-1, पोलीस उपअधिक्षक-5, पोलीस निरिक्षक-16, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक-83, पोलीस अंमलदार-578, महिला पोलीस अंमलदार-16, एसआरपीएफ प्लॉटून-1, गृहरक्षक दल पुरूष 420 आणि महिला 70 असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करतांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो याबाबीवर फक्त पोलीस दलानेच विचार का करावा, पोलीस दलापेक्षा आपल्या कुटूंबातील ज्या व्यक्तींना या निरोप आणि आगमन समारंभात सहभागी व्हायचे आहे. त्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने याकडे लक्ष दिले तर काय आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणारच नाही.