नांदेड(प्रतिनिधी)-आज 31 डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरिक्षक, कार्यालयीन अधिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक आणि पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांना सन्मानपुर्वक निरोप देण्यात आला.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस निरिक्षक भगवान दत्तात्रय कापकर (पोलीस नियंत्रण कक्ष), चंद्रकांत सुर्यभान जाधव (पोलीस अधिक्षक कार्यालय येथील कार्यालय अधिक्षक), पोलीस उपनिरिक्षक एकनाथ गेंदुजी देवके (पोलीस ठाणे विमानतळ), प्रकाश माधवराव सांगळे(शहर वाहतुक शाखा), विश्र्वनाथ रामराव केंद्रे (पोलीस ठाणे कंधार), मोहम्मद मौलाना सय्यद (पोलीस नियंत्रण कक्ष), पोलीस अंमलदार घनशाम उत्तम जाधव (पोलीस ठाणे इतवारा), रशीद खान मुर्तुजा खान पठाण (पोलीस ठाणे मुदखेड), नारायण वामन सुर्यवंशी आणि शामराव रामराव सुर्यतळ(पोलीस मुख्यालय) तसेच शेख मुबारक शेख महेबुब खान (पोलीस ठाणे कंधार) असे 11 जण आपल्या पोलीस दलातील विहित वेळेनुसार सेवानिवृत्त झाले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे आणि नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश सोनसकर यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांना सन्मानपुर्वक सहकुटूंब सत्कार करून निरोप देण्यात आला.या समारंभात पोलीस कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे, इतर शाखांमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पेालीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
