तुरूंगातील सुट्टीवर आलेला आणि फरार झालेला कैदी विमानतळ पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी सुट्टीवर आला आणि परत तुरूंगात गेला नाही याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात विमानतळ पोलीसांनी एका 29 वर्षीय व्यक्तीला गजाआड केले आहे.
राजेश विरभद्र सोनटक्के (29) रा.लक्ष्मीनगर नांदेड हा यास विनयभंगाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर तो औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्याला नियमाप्रमाणे सुट्टी देण्यात आली. पण विहित वेळ पुर्ण झाल्यानंतर सुध्दा तो कारागृहात हजर झाला नाही. पुन्हा मध्यवर्ती कारागृहाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात राजेश विरभद्र सोनटक्के विरुध्द गुन्हा क्रमांक 448/2022 कायदेशीर अभिरक्षेतून पळून गेल्याच्या सदरात दाखल झाला. विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत होते.
आज दि.2 जानेवारी रोजी पोलीस ठाणे विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांना मिळालेल्या माहितीनुसार राजेश सोनटक्के हा लक्ष्मीनगर भागात होता. पोलीस निरिक्षक काकडे यांनी आपल्या सोबत बाबा गजभारे, दारासिंग राठोड, दत्ता गंगावरे यांना सोबत घेवून राजेश सोनटक्केचा माग काढला आणि त्याला जेरबंद केले. गुन्हा क्रमांक 448 मध्ये त्याला न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक लोखंडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *