नांदेड(प्रतिनिधी)-दत्तनगर तामसा येथे एक घरफोडून चोरट्यांनी त्यातून 89 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.
सौ.रत्नमाला लक्ष्मण चिंतले यांचे दत्तनगर तामसा येथे घर आहे. दि.31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतरच्या वेळेत त्या घरात झोपल्या असतांना घराच्या मुख्य दरवाज्याचे बाहेरील कुलूप आणि आतील कडीकोंडा तोडून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. सौ.रत्नमाला यांना चाकुचा धाक दाखवून 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मनीमंगळसुत्र व त्यामधील 3 ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर, 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, तीन ग्रॅम वजनाचे पॅंडल असा एकूण 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम 1 हजार 500 रुपये असा एकूण 89 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला आहे. तामसा पोलीसांनी या संदर्भाचा गुन्हा क्रमांक 1/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक किरवले अधिक तपास करीत आहेत.
तामसा येथे घरात घुसून चाकुच्या धाकावर दोघांनी 89 हजार 500 रुपयांची लुट केली