नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेचे दबंग पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे यांनी एका जुगार अड्यावर धाड टाकून दोन आरोपींना पकडले.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे यांनी 02 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास हणेगाव ते औराद जाणाऱ्या रस्त्यावर इंडीयन तरकारी शॉपच्या समोर चाललेला कल्याण मटका नावाचा जुगार अड्डा उध्वस्त केला. तेथे चिठ्यांवर आकडे लिहुन हा मटका जुगार खेळविला जात होता. याप्रकरणात बबलु खाजामियॉं मुजावर (26) आणि बबलु टेकाळे (45) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा 13 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो मुद्देमाल मरखेल येथील पोलीस अंमलदार शेख यांच्या ताब्यात दिला. श्री.गोविंदरावजी मुंडे यांच्या तक्रारीवरुन प्रो.गुन्हा क्रमांक 8/2023 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 13 नुसार बबलु द्वयांवर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41(अ) ची नोटीस तपासीक अंमलदार शेख यांनी दिली आहे.