नांदेड(प्रतिनिधी)-मानवी व प्राणी जीवनास अपाय करणाऱ्या नॉयलॉन, प्लॉस्टीक, सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी, विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर हे आहेत.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मानवी व प्राणी जीवनास अपाय कारक असणाऱ्या नॉनलॉन, प्लॉस्टीक, सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा कोणी खरेदी-विक्री करत असेल तर तसेच कोणी त्याचा साठा करून त्याचा पुरवठा करत असेल तर याबाबत जनतेने विशेष पथकातील अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. पुढे येणाऱ्या पतंग महोत्सव, मकर संक्रात या दिवसांमध्ये पतंग उडवली जातात आणि त्यात वापरला जाणारा धागा हा आता पुर्वीसारखा राहिला नसून त्यात नॉनलॉन, सिंथेटीक, प्लॉस्टीकचा वापर होत आहे. त्यामुळे तो जागा मानवाच्या आणि प्राण्यांच्या जीवनासाठी घातक आहे. यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 36 पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक बनवले आहे. या पथकाचे प्रमुख स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक 9822458411 असा आहे. पोलीसांनी जारी केलेली अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक जनतेच्या सोईसाठी प्रसिध्द करत आहोत. असा चुकीचा मांजाचा वापर, साठवण, पुरवठा दिसला तर जनतेने याबाबतची माहिती विशेष पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी त्यांच्याविरुध्द योग्य, कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
