नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षा काळात कोरोना सुट्टी मिळाल्यानंतर तुरूंगात हजर झालेल्या एका कैद्याला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली आहे.
पोलीस ठाणे मुखेडच्या हद्दीत जीवघेणा हल्ला प्रकरणात शिक्षा झालेल्या यादव रामा ईबितदार रा.मुगाव ता.नायगाव याला कोरोना काळात औरंगाबाद तुरूंगातून सुट्टी देण्यात आली होती. परंतू सुट्टी पुर्ण झाल्यानंतर तो तुरूंगात हजर झाला नाही म्हणून रामतिर्थ पोलीस ठाण्यात औरंगाबाद तुरूंगाच्या कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यानंतर यादव ईबितदारविरुध्द गुन्हा क्रमांक 210/2022 दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, माधव केंद्रे, रुपेश दासरवाड, रणधिर राजबन्सी आणि हनुमानसिंह ठाकूर यांच्या पथकाने मुगाव ता.नायगाव येथे जाऊन यादव रामा ईबितदारला ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली.
स्थानिक गुन्हा शाखेने फरार कैदी पकडला