नांदेड(प्रतिनिधी)-चिकन खाऊ घालण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका 25 वर्षीय युवकाने एका 8 वर्षीय बालिकेला चिकन खाऊ घालण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावले आणि तिच्यासोबत अभद्र व्यवहार केला. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात जावीद मोहम्मद अब्दुल सत्तार (25) या युवकाविरुध्द भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे यांच्याकडे देण्यात आला. वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे आणि रमेश सुर्यवंशी यांनी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या युवकाला काल दि.4 जानेवारी रोजी गजाआड केले. आज 5 जानेवारी रोजी पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे, पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे, सी.व्ही.येमेकर आदींनी पकडलेला गुन्हा जावीद मोहम्मद अब्दुल सत्तार यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी आरोपीला गुन्ह्यातील तपासाची प्रगती होण्यासाठी पोलीस कोठडी मंजुर करणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्या.सी.व्ही.मराठे यांनी अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्या जावीद मोहम्मदला दोन दिवस अर्थात 7 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/01/04/8-वर्षीय-बालिकेवर-लैंगिक-अ/