अरुणा केंद्रे यांचा भुखंड दिगंबर केंद्रेने परस्पर विकला 

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रे यांचा शेत गट क्रमांक 37 मधील भुखंड क्रमांक 32 हा केंद्रे नावाच्याच व्यक्तीने तोतया मालक उभे करून तो भुखंड परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. आज याबाबतचा तक्रारी अर्ज पोलीस ठाणे भाग्यनगर येथे देण्यात आला आहे.
सौ.अरुणा शंकरराव केंद्रे या मुळ रा. वागदरा ता.जि.नांदेड येथील आहेत. पण सध्या त्या प्रभादेवी बृहन्मुंबई येथे राहतात. त्यांनी दिलेल्या अर्जानुसार 19 मार्च 1992 रोजी दस्त क्रमांक 2261/1991 नुसार भुखंड क्रमांक 32 त्यांनी पंडीत गोपीनाथ गायकवाड आणि मुंजाजी मरिबा कांबळे यांच्याकडून खरेदी केला. हा भुखंड पावडेवाडी ग्राम पंचायत हद्दीतला आहे. गाव नमुना क्रमांक 8 या अभिलेखावर माझ्या नावाची नोंद आहे. त्या संदर्भाचे कर मी वेळोवेळी भरलेले आहेत.
या संदर्भाची सर्व माहिती भुखंड खरेदी करण्यापासून आजपर्यंतची माझे नातेवाईक दिगंबर जयराम केंद्रे रा.संभाजीनगर नांदेड यांना आहे. कारण हा भुखंड दिगंबर केंद्रे यांच्या विश्र्वासावरच मी घेतला होता आणि मी मुंबईला राहते. म्हणून त्या भुखंडाचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुध्दा दिगंबर केंद्रे यांच्यावरच होती. दिगंबर केंद्रे यांनी माझा भुखंड क्रमांक 32 ज्याचे क्षेत्रफळ 92.93 चौरस मिटर आहे. हा महम्मद फय्याज महम्मद आयुब आणि शेख महम्मद शेख महेबुब दोघे रा.गणीमपुरा नांदेड यांना माझ्या परस्पर विक्री करून  माझी फसवणूक केली आहे.
मला पैशांची गरज असल्यामुळे मी माझ्या भुखंडाचे कागदपत्र मागितले तेंव्हा त्यांनी टाळाटाळ केली. मला दोन वेगवेगळ्या नावांचे भुखंड दिले आणि तरी पण मी याबद्दल माझ्या भुखंडाचे मुळ कागदपत्र मागितले तेंव्हा त्यांनी मला टाळाटाळच केली. दुय्यम निबंधक कार्यालय नांदेड येथे दिगंबर जयराम केंद्रे यांनी तोतय्या माणसे उभी करून माझा भुखंड परस्पर हस्तांतरीत करणाऱ्या महम्मद फय्याज महम्मद आयुब, शेख महम्मद शेख महेबुब यांच्यासह त्यांचे साथीदार इद्रीस सय्यद अहेमद हाशमी, नसीमा बेगम अब्दुल अजीज यांच्याविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी अशी विनंती अरुणा केंद्रे यांनी केली आहे.
भुखंडांचे अनेक घोळ 
नांदेड शहराची वाढ ज्यावेळेस झाली. त्यावेळेस अनेकांनी विकसनशिल भागात भुखंड खरेदी केले. त्यातील अनेक जण अत्यंत दुरदुरच्या गावांमध्ये राहतात. गुंतवणूक म्हणून त्यांनी नांदेडच्या विकसनशिल क्षेत्रात भुखंड खरेदी केले. आजच्या परिस्थितीत ते हजारो रुपयांचे भुखंड करोडो रुपयांचे झालेले आहेत. त्यामुळे फुकटाची संपत्ती लाटणारे अनेक माफिया नांदेड शहरात उदयाला आले. नांदेड शहरातील ज्या भुखंडांचे मालक बाहेरगावी राहतात. त्यांचे येणे-जाणे नांदेडला कमी आहे. अशा भुखंडांची ओळख करून त्या भुखंड माफियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे, बनावट लोकांना उभे करून त्याचे विक्री खत करणे असे धंदे सुरू केले. त्यामुळेच असंख्य गुंतवणुकदार, अनंत खरे व्यक्ती या भुखंड माफियांच्या तावडीत सापडले आणि त्या भुखंडांवर झालेला बेकायदेशीर ताबा त्यांना सहन करावा लागला. काही भागात तर विदेशात राहणाऱ्या मालकांच्या इमारती या भुखंड माफियांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. भुखंड मालकांच्या त्या भुखंड माफियांविरुध्द तक्रार करण्याची हिम्मत नाही. कोणी तिसरा व्यक्ती सांगेल तर तो कायद्याच्या भाषेत लोकसस्टॅंडी नसतो त्यामुळे भुखंड माफियांचे पावते आणि अशाच प्रकारे जगात प्रगल्भ लोकशाही असलेल्या या भारतात कायद्यातील त्रुटी शोधून भुखंड बळकावणारे हे माफिया आज गडगंज श्रीमंत यादीत आले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *