नांदेड(प्रतिनिधी)-येथील पावडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या एकतानगर येथे एकतानगर भिम जयंती मंडळाच्यावतीने भीमाकोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला.
दि.6 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भीमाकोरेगाव येथील शुरविरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे नेते नंदकुमार बनसोडे हे होते. त्यानंतर एकतानगर भिमजयंती मंडळाच्यावतीने प्रबोधनात्मक भिम गितांचा कार्यक्रम बुध्द विहार परिसरात संपन्न झाला.तसेच या कार्यक्रमात एकतानगर येथील ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आभार अनिल सावते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकतानगर भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष आकाश दवणे, उपाध्यक्ष सोनु बनसोडे, सचिव प्रविण हटकर, सहसचिव बबलु दिवेकर, संघटक सचिन बेंद्रीकर, सहसचिव बाळू चवणे यांच्यासह अनेक युवकांनी मेहनत घेतली.