नांदेड,(प्रतिनिधी)- कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरंगपुरा या भागात नोव्हेंबर 2021 मध्ये जबरी चोरी करणाऱ्या तीन पैकी दोन गुन्हेगारांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद करून पोलीस ठाणे कंधार यांच्या स्वाधीन केले आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये पानभोसी ते नवरंगपुरा जाणाऱ्या रस्त्यावर कार मध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीची लूट करण्यात आली होती. त्याबाबत कंधार पोलिसांना गुन्हा क्रमांक 387/ 2021 दाखल होता. या गुन्हाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हा शाखेने 7 जानेवारी 2023 रोजी सचिन परमेश्वर शिंदे रा. नमस्कार चौक नांदेड यास ताब्यात घेऊन कंधार येथील गुन्हा क्रमांक 387 बाबत विचारपूस केली. सचिन परमेश्वर शिंदेने दिलेल्या माहितीनुसार तो गुन्हा त्याचे 2 साथीदार राहुल प्रदीप जाधव राहणार शिवनगर नांदेड आणि आकाश उर्फ शाका दिगंबर वाघमारे राहणार वरवंट तालुका कंधार यांनी मिळून केलेला आहे. स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी त्वरित प्रभावाने राहुल प्रदीप जाधव यास ताब्यात घेतले. त्यावेळी 2022 मध्ये करण्यात आलेल्या लुटीतील 6 हजार रुपये किमतीचा मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी पकडलेले दोन सचिन शिंदे आणि राहुल जाधव यांना कंधार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराय धरणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी ही कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने पोलीस अंमलदार रणधीर राजबंशी, मोतीराम पवार, महेश बडगु, राजू सिटीकर, दीपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.